केईएममधील तीन निवासी डॉक्टरांना मारहाण

By admin | Published: September 26, 2015 03:27 AM2015-09-26T03:27:12+5:302015-09-26T03:27:12+5:30

केईएम रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका बाळाच्या मृत्यूनंतर चिडलेल्या नातेवाइकांनी तीन निवासी डॉक्टरांना बेदम मारहाण केली.

Three residents of KEM beat up doctors | केईएममधील तीन निवासी डॉक्टरांना मारहाण

केईएममधील तीन निवासी डॉक्टरांना मारहाण

Next

मुंबई : केईएम रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका बाळाच्या मृत्यूनंतर चिडलेल्या नातेवाइकांनी तीन निवासी डॉक्टरांना बेदम मारहाण केली. डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या दोघांना केईएम प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनंतर ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या केईएमच्या सुमारे ३५० निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. बालरुग्ण विभागातील डॉ. पुनीत गर्क, डॉ. कुशल शरणागत आणि डॉ. सुहास चौधरी या तीन निवासी डॉक्टरांना मारहाण झाली आहे.
केईएमच्या बालरुग्ण विभागात एका साडेतीन वर्षीय मुलाला गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दाखल करण्यात आले होते. या मुलाची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना पहाटे साडेचारच्या सुमारास मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त नातेवाइकांनी तेथील तीन निवासी डॉक्टरांना रॉडने मारहाण केली.
याचा निषेध म्हणून केईएम रुग्णालयातील ३५० निवासी डॉक्टरांनी शुक्रवारी काम बंद ठेवले होते.

Web Title: Three residents of KEM beat up doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.