Anganewadi Jatra 2020 : सिंधुदुर्गातील आंगणेवाडी जत्रेसाठी मुंबईहून तीन विशेष एक्स्प्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 06:28 AM2020-01-24T06:28:03+5:302020-01-24T06:28:36+5:30
Anganewadi Jatra 2020 Special Trains : जत्रेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेलहून सावंतवाडी, थिवि आणि करमाळीसाठी विशेष एक्स्प्रेस सोडण्यात येतील.
मुंबई : आंगणेवाडी जत्रेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेलहून सावंतवाडी, थिवि आणि करमाळीसाठी विशेष एक्स्प्रेस सोडण्यात येतील. या जत्रेसाठी या मार्गावर तीन साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस धावतील.
एलटीटी ते सावंतवाडी रोड विशेष एक्स्प्रेस १४ फेब्रुवारी रोजी एलटीटीहून मध्यरात्री १.१० वाजता सुटेल. ती त्याच दिवशी दुपारी १२.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. तर, सावंतवाडी रोडहून १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता परतीच्या प्रवासाला निघेल. ती एलटीटीला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.२० वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, मडगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबा देण्यात येईल.
एलटीटी ते सावंतवाडी रोड विशेष एक्स्प्रेस १७ फेब्रुवारीला एलटीटीहून मध्यरात्री १.१० वाजता सुटेल. दुपारी १२.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. तर, परतीच्या प्रवासासाठी सावंतवाडी रोडहून १७ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता सुटेल. ती एलटीटीला दुसºया दिवशी रात्री ३.२५ वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, मडगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबा देण्यात येईल.
एलटीटी ते थिवि विशेष एक्स्प्रेस १४ फेब्रुवारी रोजी एलटीटीहून रात्री ८.४५ वाजता सुटेल. ही गाडी दुसºया दिवशी सकाळी ७.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. तर, परतीच्या प्रवासासाठी थिविहून १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.५५ वाजता सुटेल. ही गाडी एलटीटीला दुसºया दिवशी मध्यरात्री १२.२० वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, मडगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबा देण्यात येईल.