मध्य रेल्वेच्या तीन विशेष गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:06 AM2021-07-04T04:06:14+5:302021-07-04T04:06:14+5:30
मुंबई : मध्य रेल्वेकडून मुंबई-बरेली, भुसावळ -हजरत निजामुद्दीन आणि साईनगर शिर्डी- कालकादरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. लोकमान्य टिळक ...
मुंबई : मध्य रेल्वेकडून मुंबई-बरेली, भुसावळ -हजरत निजामुद्दीन आणि साईनगर शिर्डी- कालकादरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस-बरेली विशेष साप्ताहिक १२ जुलैपासून टिळक टर्मिनस येथून दर सोमवारी ०८.०५ वाजता सुटेल आणि बरेलीला दुसऱ्या दिवशी साडेतीन वाजता पोहोचेल.
बरेली येथून विशेष साप्ताहिक गाडी १० जुलैपासून दर शनिवारी ११.२५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सव्वाचार वाजता पोहोचेल. भुसावळ - हजरत निजामुद्दीन विशेष द्वि-साप्ताहिक ११ जुलैपासून भुसावळ येथून दर मंगळवार आणि रविवारी ६.०० वाजता सुटेल आणि हजरत निजामुद्दीनला दुसऱ्या दिवशी ५.०० वाजता पोहोचेल. हजरत निजामुद्दीन येथून विशेष द्वि-साप्ताहिक गाडी ९ जुलैपासून हजरत निजामुद्दीन येथून दर शुक्रवारी आणि रविवारी ३.०५ वाजता सुटेल आणि भुसावळ येथे दुसऱ्या दिवशी ३.०५ वाजता पोहोचेल.
साईनगर शिर्डी-कालका विशेष द्वि-साप्ताहिक १० जुलैपासून साईनगर शिर्डी येथून दर मंगळवार आणि शनिवारी १०.०० वाजता सुटेल आणि कालका येथे दुसऱ्या दिवशी १२.१० वाजता पोहोचेल. कालका येथून विशेष द्वि-साप्ताहिक ८ जुलैपासून दर गुरुवारी आणि रविवारी ५.२० वाजता सुटेल आणि साईनगर शिर्डी येथे दुसऱ्या दिवशी ६.४० वाजता पोहोचेल.