Join us  

तीन विद्यार्थिनींना नर्सिंगमध्ये १०० पर्सेंटाईल

By रेश्मा शिवडेकर | Published: June 19, 2024 8:01 PM

नर्सिंग सीईटीचा निकाल जाहीर

मुंबई-नर्सिंगच्या अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या सीईटीचा निकाल बुधवारी जाहीर कऱण्यात आला असून राज्यातील तीन विद्यार्थिनींनी १०० पर्सेंटाईल मिळविण्याची कामगिरी केली आहे. गडचिरोलीतील प्रियांका घनश्याम बोलिवार, जळगावची सुझान नियाजुद्दीन शेख आणि नागपूरची संगीता बाकेलाल साहू यांनी ही कामगिरी केली आहे.

राज्यभरातून ५०,२१७ मुलामुलींनी ही परीक्षा दिली होती. यात ३७,५२४ मुली तर १२,६९१ मुलगे होते. तर दोन तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

नम्रता सुधाकर कासेवाड ९९.९९ पर्सेंटाईल मिळवत इतर मागासवर्गीयातून (ओबीसी) प्रथम आली आहे. दिया संतोष रेपाळ ही एसबीसीतून ९९.७१ पर्सेंटाईल मिळवून पहिली आली आहे. तर अनुसूचित जातीतून संजना सुर्यकांत करंडे (९९.९७ पर्सेंटाईल) आणि अनुसूचित जमातीतून सुहानी नामदेव खांदाते (९९.९० पर्सेंटाईल) पहिल्या आल्या आहेत.

टॅग्स :परीक्षा