Join us

राज्यात तीन हजार ३२० रुग्ण, ६१ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:07 AM

मुंबई : राज्यात गुरुवारी ३ हजार ३२० कोरोनाबाधित रुग्ण आणि ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात रुग्ण निदानाच्या ...

मुंबई : राज्यात गुरुवारी ३ हजार ३२० कोरोनाबाधित रुग्ण आणि ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. दिवसभरात ४ हजार ५० रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, आतापर्यंत ६३ लाख ५३ हजार ७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ३९ हजार १९१ रुग्ण उपचाराधीन आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ७६ लाख ४६ हजार ५१५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११.३४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ६१ हजार ८४२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १ हजार ४६१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२२ टक्के आहे, तर मृत्युदर २.१२ टक्के आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६५ लाख ३४ हजार ५५७ असून, मृतांची संख्या १ लाख ३८ हजार ७२५ इतकी आहे.