Join us

राज्यात वंचितचे तीन हजार ७६९ उमेदवार विजयी, तर २८० ग्रामपंचायतींवर एकहाती सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:07 AM

२८० ग्रामपंचायतींवर एकहाती सत्तालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राज्यात वंचित बहुजन आघाडीचे तीन हजार ...

२८० ग्रामपंचायतींवर एकहाती सत्ता

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राज्यात वंचित बहुजन आघाडीचे तीन हजार ७६९ उमेदवार विजयी झाले, तर २८० ग्रामपंचायतींवर वंचित बहुजन आघाडीने एकहाती सत्ता मिळवलेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा पक्ष म्हणून पुढे आल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत म्हटले.

दिल्लीत झालेल्या शाहीन बाग आंदोलनाच्या धर्तीवर देशभर किसान बाग आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत भायखळा येथील खिलाफत हाऊस याठिकाणी प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीबाबत माहिती दिली. ३ हजार ७६९ उमेदवार निवडून आले, तर २८० ग्रामपंचायतींवर वंचितने एकहाती सत्ता मिळवली आहे. जिल्हा, तालुकास्तरावर घेतलेल्या अधिकृत माहितीवरून ही आकडेवारी समोर मांडत असल्याचे आंबेडकर म्हणाले.