तीन हजारांसाठी उत्तरपत्रिकेत फेरफार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 02:28 AM2018-10-23T02:28:42+5:302018-10-23T02:28:46+5:30

तीन हजार रुपयांसाठी मुंबई विद्यापीठात उत्तर पत्रिकांचा फेरफार केल्याचे उघड झाले आहे.

For three thousand, change the answer sheet | तीन हजारांसाठी उत्तरपत्रिकेत फेरफार

तीन हजारांसाठी उत्तरपत्रिकेत फेरफार

Next

मुंंबई : तीन हजार रुपयांसाठी मुंबई विद्यापीठात उत्तर पत्रिकांचा फेरफार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी अटक केलेल्या संदीप पालकर, प्रवीण बागल, संगमेश कांबळे या तीन शिपायांसह सय्यद नदीम अहमद निजामुद्दीन या विद्यार्थ्याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ झाली आहे.
तिघे शिपाई कंत्राटी पद्धतीने विद्यापीठात काम करीत होते. निजामुद्दीन याने या तिघांना उत्तरपत्रिकेचे फेरफार करण्यासाठी प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याचे कबूल केले होते. त्या पैशांसाठी त्यांनी उत्तरपत्रिका निजामुद्दीनला नेऊन दिली, असे तपासामध्ये उघड झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. पडसालकर या प्रकरणी तपास करत आहेत.
मुंबई विद्यापीठात गरवारे इन्स्टिट्यूटच्या ‘मास्टर आॅफ सबस्टेनेबल डेव्हलपमेंट’ या अभ्यासक्रमांतर्गत युनिट आॅपरेशन अँड प्रोसेस या विषयाची परीक्षा गेल्या आठवड्यात घेण्यात आली होती. त्याची सीलबंद उत्तरपत्रिका शिपायांनी निजामुद्दीनला नेऊन दिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विद्यापीठाने या प्रकरणी तक्रार दाखल केली.

Web Title: For three thousand, change the answer sheet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.