म्हाडाला जूनपर्यंत मिळणार संक्रमण शिबिरातील तीन हजार घरे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 12:47 AM2019-05-18T00:47:12+5:302019-05-18T00:47:29+5:30

आपत्कालीन परिस्थितीत म्हाडाच्या मुंबई इमारत आणि दुरूस्ती मंडळाकडून म्हाडाची संक्रमण शिबिरे उपलब्ध करून देण्यात येतात.

Three thousand houses in transit camp will be available from MHADA till June | म्हाडाला जूनपर्यंत मिळणार संक्रमण शिबिरातील तीन हजार घरे

म्हाडाला जूनपर्यंत मिळणार संक्रमण शिबिरातील तीन हजार घरे

Next

मुंबई : दक्षिण मुंबईतील बॉम्बे डार्इंग आणि श्रीनिवास मिल या गिरण्यांच्या जागेवरील संक्रमण शिबिरातील सुमारे तीन हजार घरे जूनपर्यंत म्हाडाला मिळणार आहेत. याबाबतची माहिती म्हाडाच्या दुरूस्ती आणि पुर्नरचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली आहे.
आपत्कालीन परिस्थितीत म्हाडाच्या मुंबई इमारत आणि दुरूस्ती मंडळाकडून म्हाडाची संक्रमण शिबिरे उपलब्ध करून देण्यात येतात. म्हाडामार्फत सध्या बीडीडी आणि इतर गृहप्रकल्प राबवण्यात येत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर म्हाडाला संक्रमण शिबिरांची आवश्यकता आहे. या घरांचा साठा वाढावा यासाठी घोसाळकर यांनी बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास मिलमधील प्रकल्पांना काही दिवसांपूर्वी भेट देत आढावा घेतला होता.
काही विकासकांनी म्हाडाकडून घेतलेल्या संक्रमण शिबिरांचा ताबा अद्याप म्हाडाला देण्यात आलेला नाही. न्यायालयाने बॉम्बे डाईंगमधील १ हजार ६३२ आणि श्रीनिवास मिलमधील १ हजार ८७५ घरे म्हाडाच्या ताब्यात देण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.
१ हजार ५०० घरे गिरणी कामगारांसाठी उपलब्ध होणार असून यापैकी १ हजार ५०० सदनिका संक्रमण शिबिरासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. १ हजार २०० सदनिका बीडीडी चाळकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार असून उर्वरित सदनिका दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला मिळणार आहेत.

Web Title: Three thousand houses in transit camp will be available from MHADA till June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा