Join us  

'तीन तिघाडा, काम बिघाडा सरकार...'; जालना प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 7:19 PM

जालना येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

मुंबई- जालना येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर टीका केली होती. या टीकेला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत ठाकरेंवर आरोप केले, यावर आता माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी या सरकारने राजीनामे द्यावेत अशी मागणी केली आहे. 

सरकारच्या जीआरची वाट बघणार; नुसत्या बैठका नको, पहिले पाढे वाचायचे नाहीत: मनोज जरांगे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या सरकारच्या काळात आरक्षण टीकलं नाही, तेव्हा बाकीचे विकेट किपर होते तेव्हा काही का केलं नाही, अजितदादाही आमच्या सरकारमध्ये होते. माझ काय चुकत होतं तेव्हा त्यांनी सांगायला हवं होते. आम्ही कुठेही वकील बदललेले नव्हते. आता महत्वाच म्हणजे त्यावेळचे अपयश मला देत असाल तर आता तुम्ही डोकी फोडली आहेत, त्याची जबाबदारी सगळ्यांनी टीम वर्क म्हणून स्वीकारली पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले.

" आतापर्यंत मी गृहमंत्र्यांचा राजीमाना मागत होतो, आता टीम वर्क म्हणून या तिघांनीही राजीनामा दिला पाहिजे. हा दोष त्यांच्या टीमचा आहे.एकुणच हे तीन तिघाडी सरकार आहे, ट्रीपल इंजिन न्याय, हक्कासाठी रस्त्यावर यायच नाही, नाहीतर आम्ही मारहाण करु, असंच या सरकारच सुरू आहे. बारसुमध्ये असंच झालं होतं. जबाबदारी कोण घेणार? आदेश कुणी दिला? डोळ्या देखत जर पोलीस न जुमानत वागत असतील तर त्यांचा प्रशासनावर कंट्रोल नाही असा याचा अर्थ होतो त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, असंही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

उद्धव ठाकरे म्हणाले, त्यावेळचे आरोप माझ्यावर करत असाल तर तुम्ही आता जबाबदारी घेऊन राजीनामे द्यायला हवेत. देवेंद्र फडणवीस यांच ज्ञान एवढ तोकडं असेल असं वाटलं नव्हत. वटहुकूम याबाबत काढण्याचा अधिकार संसदेला आहे. सुप्रीम कोर्टाचा दिल्लीतील निर्णय केंद्राने फिरवला, तसा हा निर्णय केंद्राचा आहे.हा अधिकार केंद्राचा आहे. जर वटहुकून राज्य सरकार काढायला लागली, याचा अर्थ त्यांचा अभ्यास कमी असेल, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.  

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसअजित पवारएकनाथ शिंदे