तोकड्या यंत्रणेमुळे आरोग्यसेवेचे तीनतेरा

By admin | Published: March 15, 2015 01:34 AM2015-03-15T01:34:06+5:302015-03-15T01:34:06+5:30

जगभर धुमाकुळ घालणाऱ्या स्वाईन फ्ल्यूचे राज्यात वर्षभरात २६२ बळी गेल्याने सरकारच्या अकार्यक्षमतेचा बुरखा टराटरा फाटला आहे़

Three types of health service | तोकड्या यंत्रणेमुळे आरोग्यसेवेचे तीनतेरा

तोकड्या यंत्रणेमुळे आरोग्यसेवेचे तीनतेरा

Next

नारायण जाधव ल्ल ठाणे
साथीच्या आजारांचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन सक्षम आणि सतर्क असल्याच्या वल्गना राज्य सरकार करीत असले तरी जगभर धुमाकुळ घालणाऱ्या स्वाईन फ्ल्यूचे राज्यात वर्षभरात २६२ बळी गेल्याने सरकारच्या अकार्यक्षमतेचा बुरखा टराटरा फाटला आहे़ राज्य सरकारच्या आरोग्य खात्याकडे अपुरी यंत्रणा असल्याने सरकारला साथींवर नियंत्रण मिळविण्यात अपयश येत असल्याचे दिसत आहे़
राष्ट्रीय आरोग्य मिशनसाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या संकेतस्थळानेच राज्याच्या आरोग्य खात्यातील अपुऱ्या यंत्रणेचा पर्दापाश केला आहे़ यामुळे ठाण्यातील कळवा येथे आणि पालघरच्या विक्रमगड येथे एका अबलेची रूग्णालयाबाहेर प्रसुती झाल्याच्या ह्रदयद्रावक घटना घडल्या आहेत़
या संकेतस्थळानुसार राज्यात २८३० आरोग्य उपकेंद्रासह ३७८ प्राथमिक आरोग्य केंद्र, १८३ कम्युनिटी हेल्थ सेंटरसह १८३ स्त्रीरोग तज्ज्ञ, १८२ बालरोग तज्ज्ञ, आरोग्य केंद्रातील ९३८ विषेशतज्ज्ञ, २७८ क्ष-किरण तज्ज्ञ, ८३९ प्रयोगशाळा तज्ज्ञांसह ३९१५ आरोग्य सेवकांची कमतरता आहे़ यामुळे राज्यात साथीच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे़
स्वाईनच्या नियंत्रणासाठी राज्य सरकारने मुंबईच्या कस्तुरबा, ठाणे सिव्हीलसह त्या त्या ठिकाणच्याा महापालिका रूग्णालयांत नियंत्रण कक्ष उघडले असले तरी त्याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने रूग्णांना खासगी रूग्णालय किंवा मुंबई-पुण्यात धाव घ्यावी लागत आहे़ यात उपचार आणि औषधोपचारात उशीर झाल्याने स्वाईनचे राज्यात २६४ बळी गेल्याचे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले़
राज्यासाठी समाधानाची बाब म्हणजे ग्रामीण भागात काम करणाऱ्या आशा स्वंयसेवकांची संख्या २२१३५ आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची संख्या २७४७ असून जी गरजेपेक्षा कितीतरी जास्त आहे़

जनक्षोभ का ?
प्रयोगशाळा तज्ज्ञांची तुटवडा असल्याने अनेक आजारांसाठी घ्याव्या लागणाऱ्या विविध वैद्यकीय चाचण्यांचा अहवाल उशिराने मिळत असून त्यामुळे रोगाचे निदान करणे आहे त्या डॉक्टरांना अवघड होऊन बसले आहे़ यातून अनेक ठिकाणी रूग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण, शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचे प्रकार घडले आहेत़ तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांना राहण्यास निवास व्यवस्था नसल्यानेही अडचणी येत आहेत़

Web Title: Three types of health service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.