मुंबई : पार्टीसाठी हाउसबोटचा वापर करणे बंधनकारक असतानाही पवई तलावात सर्रासपणे याचा वापर सुरू असल्याचे पवई हाउसबोट अपघातातून उघड झाले. यात तिघांचा बळी गेला तर पाच जण बचावले. मात्र अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. हाउसबोटच्या वापरासाठी असोसिएशनचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप पर्यावरण अभ्यासकांकडून करण्यात येत आहे.पवई तलावात गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र स्टेट अंँग्लिग असोसिएशनच्या हाउसबोट सुरू आहेत. या हाउसबोटचा वापर फक्त त्यांच्या सभासदांना मच्छी पकडण्यासाठी आहे, पार्टीसाठी नाही. शनिवारी रात्री या संस्थेच्या एका सभासदाच्या नावावर असलेली बोट पार्टीसाठी देण्यात आली होती. हीच बोट उलटून तिघांचा मृत्यू झाला. ज्या दिवशी घटना घडली तेव्हा भांडुपमध्ये वर्चस्व असलेला मोठा नेता त्या ठिकाणी उपस्थित होता.पवई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे. बोट कुणाच्या मालकीची आहे, ही बोट पार्टीसाठी का दिली, याबाबतची माहिती देण्यासाठी पवई पोलिसांनी असोसिएशनला पत्र धाडले आहे. त्यांच्याकडून याबाबत माहिती मिळताच पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पवई पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)हाउसबोट चालकाच्या नियमावलींची माहिती सामान्य नागरिकांना समजेल अशा स्वरूपात नमूद करावी. मुळात अनेकदा ही हाउसबोट संपूर्ण पवई तलावावर कब्जा करून असते. पवई तलावाच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्तावातही हा मुद्दा प्रकर्षाने समोर आणून दिला होता. मात्र त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.- सुनीश कुंजू, सचिव, प्लॅण्ट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन, पॉज.
तिघांचा बळी जाऊनही गुन्हा दाखल नाही!
By admin | Published: December 27, 2016 2:04 AM