Join us

एक्स्प्रेस-वेवर ठाणे येथील तीन महिला ठार

By admin | Published: March 27, 2016 3:28 AM

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून वॅगनर कार रस्त्यामध्ये असलेल्या दुभाजकाला धडकली.

खालापूर : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून वॅगनर कार रस्त्यामध्ये असलेल्या दुभाजकाला धडकली. या अपघातात ठाणे येथील एकाच कुटुंबातील तीन महिला ठार झाल्या असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला.मूळ सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथील रहिवासी असलेले सतीश गोपाळ कदम कुटुंबासह कामानिमित्त ठाण्यात राहतात. होळीसाठी कदम कुटुंब कासेगाव येथे वॅगनर कारने गेले होते. होळीचा सण आटोपल्यानंतर पुन्हा ठाण्याला परतताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर भरधाव वेगात कार असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्ता दुभाजकावर धडकल्यानंतर पलटी झाली. यामध्ये हिराबाई गोपाळ कदम (६५), मनीषा शिवाजी कदम (४३), जयश्री मंगेश कदम (४०) या जागेवरच ठार झाल्या तर सतीश गोपाळ कदम (३०), अदिती मंगेश कदम (१३), वेदान्त मंगेश कदम (६), रितेश शिवाजी कदम (१३) हे गंभीर जखमी झाले. अपघातात जखमी झालेल्या चारही जणांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.