बॉक्स
या घटनेची माहिती मिळताच, अलिबागवरून श्वानपथक, फिंगर प्रिंट पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास करून पुरावे गोळा करण्याचे काम केले. घटनेचे वृत्त पेणमध्ये पसरताच विविध संघटना, आदिवासी समाजातील लोक, राजकीय कार्यकर्ते यांनी पेण उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी कायदा सुव्यवस्था भंग होऊन नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक रुग्णालय परिसरात तैनात ठेवण्यात आली होती. यामुळे पेणमध्ये छावणीचे स्वरूप आले होते.
कोट :
माणुसकीला काळिमा फासणारी निंदनीय घटना घडली आहे, याचा मी निषेध करते. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलीस यंत्रणेने प्राथमिक स्तरावर जलद गतीने तपास करत आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे. आता जलदगती न्यायालयात खटला दाखल करून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी.
-आदिती तटकरे, पालकमंत्री
अत्यंत हृदय हेलावून टाकणारी घटना असून, अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्याही केली जाते, अशा घटना राज्यात घडतात, हा अतिरेक होत आहे. जामिनावर सुटलेल्या मानसिक विकृती असलेल्या गुन्हेगारांना कायद्यांतर्गत कडक शिक्षा मिळाली पाहिजे, असे माझे स्पष्ट मत आहे.
- प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद