- आरीफ पटेल, मनोरसत्ताधाऱ्यातील हाणामाऱ्या त्यात विरोधकांनी लावलेल्या कलागतींची पडलेली भर यामुळे एकेकाळी जिल्ह्याची भूषण असलेली जव्हार अर्बन को.आॅप.बँक सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळेच या बँकेची २९ जुलै रोजी होणारी निवडणूक तिच्या अस्तित्वासाठी निर्णाय ठरणारी आहे. संचालक मंडळाची मनमानी आणि बँकेची आर्थिक अनियमितता इतकी वाढली की, बँकेच्या प्रगतीचा आलेख झपाट्याने घसरला आहे. बँक कधीही दिवाळखोरीत जाईल, अशी भीतीयुक्त शंका भागधारक व्यक्त करीत आहेत. एकेकाळी ‘अ’ वर्ग असलेली बँक सध्या ‘ब’वर्गातही गटांगळ्या खात कशीबशी तग धरून आहे आणि एनपीए (नॉन परफॉर्मिंग) अॅसेट्सचे प्रमाण चक्क ४९ टककयांपर्यंत पोहोचले आहे. जिल्ह्यातील अपवादात्मक सहकारी बँका सोडल्या तर जव्हार अर्बन बँकेचे यश हे अन्य बँकांपेक्षा नजरेत भरणारे होते. याचे कारण कार्यक्षम कर्मचारी व नि:स्वार्थी आणि सामाजिक बांधिलकी जपणारे संचालक मंडळ यांच्या अथक प्रयत्नांनीच हे यश प्राप्त झाले होते. बँकेच्या शाखा उघडल्या गेल्यात. बँकेला सातत्याने आॅडिट वर्ग अ मिळत होता. एनपीएचे प्रमाण मर्यादेत होते. राजकारणापेक्षा अर्थकारण महत्त्वाचे या भावनेने काम करणारी सर्व मंडळी होती. परंतु, गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील अग्रगण्य असणाऱ्या बँकेची स्थिती ढासाळली आहे.सन २०१३-१४ मध्ये २८ टक्के एनपीए होता, तर २०१४-१५ मध्ये तो ४९ टककयांवर पोहोचला. याचाच अर्थ बॅँकेचे जवळजवळ ३३ ते ३४ कोटी कर्जात बुडून कुठलीच प्रगती दिसत नाही. तसेच गेल्या दोन वर्षांपासून सभासदांना मिळणारा लाभांशही मिळालेला नाही. अशा परिस्थितीत चालू वर्षातही सभासदांना लाभांश देता येणार नाही. या बाबी बँकेची विद्यमान स्थिती दर्शविण्यासाठी पुरेशा बोलक्या असल्याचे मतदारांकडून बोलले जात आहे. कुठे नेऊन ठेवली अर्बन बँक माझी... असे उपहासात्मक उद्गार ठिकठिकाणी ऐकू येत असल्याने जुलैच्या उत्तरार्धात बँकेचे भवितव्य नेमके काय असेल, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.बॅँकेचा इतिहास काय सांगतो?१सध्या जव्हारमध्ये अर्बन बँकेच्या निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापू लागले आहे. पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यातील व हल्लीच्या पालघर जिल्ह्यातील ही सहकारी बँक खूप जुनी असून जव्हारचे राजे श्रीमंत यशवंतरावजी मुकणे यांनी सन १९४९ मध्ये म्हणजेच भारत स्वतंत्र झाल्यानंतर लगेचच बँकेची स्थापना केली. २आज सुमारे ६६ वर्षे पूर्ण केलेली ही बँक तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रातील मानाचा तुरा होती. श्रीमंत राजे साहेबांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या बँकेचे आजचे कार्यक्षेत्र, स्वरूप पाहिले तर बँकेने जव्हार, मोखाडा, विक्रमगड, मनोर, कुडूस, बोईसर या ठिकाणी शाखा उघडून चांगल्या अर्थकारणाचा आदर्श घडविला होता. सत्ताधारी काय म्हणतात?बँकेचे एनपीए ४९ टक्के आहे हे खरे असले तरी विरोधकांनी कर्जदारांना त्यांनी कर्जाची परतफेड करू नये, त्याचे कर्ज माफ होणार आहे किंवा सत्तेवर आलो तर आम्ही ते माफ करू, असा दिशाभूल करणारा प्रचार गेल्या काही महिन्यांपासून चालविला आहे. त्यामुळे कर्ज वसूलीला खीळ बसल्यामुळे एनपीए वाढले आहे, असे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे.जव्हार अर्बन को-आॅप. बँकेची पंचवार्षिक निवडणूक २९ जुलै रोजी होणार असून बँकेचे कार्यक्षेत्र लोकसभा मतदारसंघाएवढे आहे. यामध्ये जव्हार, मोखाडा, विक्रमगड, मनोर, बोईसर, कुडूस या शाखा कार्यरत आहेत. तेथील सभासदांची संख्या १०,५८० इतकी आहे. यात सहकार पॅनल व शिवनेरी पॅनल असे दोन पॅनल हे रिंगणात उतरले आहेत. बँकेच्या निवडणुकीमध्ये सहकार पॅनलच्या वतीने आम्ही पूर्णपणे सभासदांना गेल्या दोन वर्षांपासून न मिळालेल्या लाभांशाबाबत आणि बँकेच्या ४९ टक्क्यांपर्यंत वाढलेल्या एनपीए बाबत नेमकी वस्तुस्थिती काय आहे? हे आम्ही सभासदांच्या घरोघरी जाऊन कथन करीत आहोत. या स्थितीवर कोणते उपाय असू शकतात? त्याचीही माहीती आम्ही सभासदांपर्यंत पोहोचवित आहोत. - रियाज मनियार, माजी संचालक, दी जव्हार अर्बन बँक तथा माजी नगराध्यक्ष ज.न.प.सत्ताधाऱ्यांनी बॅँकेच्या कामकाजात इतका भ्रष्टाचार केला आहे की, बॅँक अक्षरश: डबघाईला आलेली आहे. नफा नसताना अव्यवहार्यतने नवीन शाखा उघडून तोट्यात आणल्या आहेत, मोखाडा शाखा अंदाजे २० लाख तोट्यात, तर बोईसर शाखा अंदाजे ५ लाख तोट्यात असून यामुळे बॅँक डबघाईला नेण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे मी माझ्या संचालकपदाचा राजीनामा देऊन सत्ताधाऱ्यांमधून बाहेर पडलो. - रवींद्र शिवदे, माजी संचालक, दी जव्हार अर्बन को-आॅप. बॅँक, जव्हार
जव्हार अर्बन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर
By admin | Published: July 25, 2015 10:17 PM