Join us

साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणूकी द्वारेच

By admin | Published: October 15, 2016 6:28 AM

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकरिता अर्ज दाखल केलेल्या चारही साहित्यिकांनी माघार न घेण्याचा निर्णय घेतला, तर निवडणूक अटळ

डोंबिवली : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकरिता अर्ज दाखल केलेल्या चारही साहित्यिकांनी माघार न घेण्याचा निर्णय घेतला, तर निवडणूक अटळ असेल व त्यामुळे येथील संमेलनाचा अध्यक्ष कोण, याचा फैसला होण्याकरिता ११ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. निवडणूक रिंगणातून माघार घेण्याची अंतिम तारीख ही १७ आॅक्टोबर आहे. रिंगणातून कोण माघार घेतो, हे स्पष्ट झाल्यावर मतपत्रिका छापण्यात येणार आहेत, असे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने स्पष्ट केले. ज्येष्ठ समीक्षक अक्षयकुमार काळे, मदन कुलकर्णी, लेखक प्रवीण दवणे आणि जयप्रकाश घुमटकर हे चारजण सध्या रिंगणात आहेत. काळे हे विदर्भातील आहेत, तर दवणे व घुमटकर हे वर्गमित्र ठाण्यातील आहेत. दवणे व घुमटकर यांनी माघार न घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. काळे यांनी मोठ्या आत्मविश्वासाने निवडणूक रिंगणात पाऊल ठेवले आहे. मतपत्रिका मतदारांनी १० डिसेंबरपर्यंत भरून द्यायची आहे. त्यानंतर, अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल ११ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. (प्रतिनिधी)