मराठी अॅपच्या माध्यमातून शिक्षणक्रांती, लाँच केले नवे अॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 03:17 AM2017-11-05T03:17:00+5:302017-11-05T03:17:20+5:30
शिक्षणविषयक आणि शिक्षणातील विज्ञानविषयक जागृती निर्माण करण्यासाठी सुरू झालेल्या शिक्षणक्रांती संघटनेने आता अॅपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला असून, शिक्षणक्रांतीचे नवे अॅप नुकतेच लाँच केले आहे.
मुंबई : शिक्षणविषयक आणि शिक्षणातील विज्ञानविषयक जागृती निर्माण करण्यासाठी सुरू झालेल्या शिक्षणक्रांती संघटनेने आता अॅपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला असून, शिक्षणक्रांतीचे नवे अॅप नुकतेच लाँच केले आहे.
या अॅपमध्ये विद्यार्थी-पालकांना विविध विषयांचे ज्ञान तर मिळणार आहेच, शिवाय सोप्या-सोप्या टिप्सही मिळविता येणार आहेत. मेंदू सक्रिय ठेवण्यासाठी आणि तो तल्लख करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग सांगण्यात आले आहेत. ई-शिक्षणक्रांती तथा शिक्षक प्रशिक्षक वेबीनार, या सर्वांचा या अॅपमध्ये समावेश करण्यात आला आहे, तसेच शिक्षणविषयक बातम्यांचे अपडेट्सही या अॅपवर मिळण्याची सोय आहे.
संघटनेचे भास्कर जोशी यांनी सांगितले की, हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर ‘शिक्षणक्रांती’ या नावाने उपलब्ध करून देण्यात आले आहे़
ते अँड्रॉइड फोनवर सहजपणे वापरता येते. स्मार्ट फोनच्या काळात भावी पिढीचे मनोबल वाढवीत असतानाच, मेंदूसंस्कार करणारे नवनवे प्रयोग मोबाइलवर उपलब्ध करण्याच्या हेतूने नुकतेच शिक्षणक्रांती नावाचे अॅप मराठी मुलांसाठी, पालक तथा शिक्षकांसाठी हे मोफत उपलब्ध करून दिले आहे़