राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या माध्यमातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:07 AM2021-09-27T04:07:54+5:302021-09-27T04:07:54+5:30

- ३ अब्ज ३५ कोटी रुपयांची विक्रमी वसुली लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या माध्यमातून शनिवारी मुंबईत ...

Through the National People's Court | राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या माध्यमातून

राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या माध्यमातून

Next

- ३ अब्ज ३५ कोटी रुपयांची विक्रमी वसुली

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या माध्यमातून शनिवारी मुंबईत तब्बल १,५७,८८४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. आजवरची ही विक्रमी कामगिरी असून, या माध्यमातून जवळपास तीन अब्ज ३५ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार मुंबई जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाद्वारे शनिवारी मुंबईतील सर्व न्यायालयांत लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले. त्याकरिता मुंबई जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीनिवास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव न्या. हितेंद्र वाणी यांनी २ ऑगस्टपासून याबाबत नियोजन सुरू केले होते.

या वेळच्या राष्ट्रीय लोक अदालतीत मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, बँकांचे वसुलीचे दावे, कोर्टात प्रलंबित असलेली तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, वैवाहिक प्रकरणे, धनादेश अनादर झाल्याचे खटले, वीज कंपन्यांनी दाखल केलेले खटले, वित्त संस्था तसेच टेलिकॉम कंपन्यांची वसुली प्रकरणे व पोलिसांची वाहतूक चलनाबाबतची प्रकरणे अशी एकूण नऊ लाख ३७ हजार ७५५ प्रकरणे राष्ट्रीय न्यायालयात ठेवण्यात आली.

मुंबईच्या लोकन्यायालयाच्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक म्हणजे तब्बल एक लाख ५७ हजार ८८४ प्रकरणे या दिवशी निकालात काढण्यात आली. या माध्यमातून ३ अब्ज ३५ कोटी रुपयांची विक्रमी वसुली झाली.

...........

तृतीयपंथीयांना सहभागाची संधी

तृतीयपंथी व्यक्तींकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा व त्यांना समाजात सन्मानाचे स्थान प्राप्त व्हावे या दृष्टीने या वेळेच्या राष्ट्रीय लोक न्यायालयात प्रथमच सलमा खान, प्रिया पाटील व अनिता वाडेकर अशा तीन तृतीयपंथीयांना शहर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई येथील लोकन्यायालयात पॅनल सदस्य म्हणून नेमण्यात आले.

.......

फोटो

न्यायाधीश एम. आर. पुरवार, वकील श्र्उबैद घावटे व तृतीयपंथी पॅनल सदस्य सलमा खान लोक न्यायालयाचे कामकाज पाहताना.

..........

Web Title: Through the National People's Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.