मुंबईत ‘जोर’धार; रस्त्यांंसह हवाई वाहतुकीलाही फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 02:44 AM2019-07-27T02:44:44+5:302019-07-27T02:44:55+5:30

सखल भागात साचले पाणी : १७ ठिकाणी झाडे पडली

The 'thrust' in Mumbai; Air traffic along roads also hit | मुंबईत ‘जोर’धार; रस्त्यांंसह हवाई वाहतुकीलाही फटका

मुंबईत ‘जोर’धार; रस्त्यांंसह हवाई वाहतुकीलाही फटका

Next

मुंबई : ढगांचा गडगडाट आणि कडाडणाऱ्या विजा, वेगाने वाहणारे वारे आणि क्षणभरात बदलणाºया हवामानामुळे मुंबई शहर आणि उपनगरात कोसळणाºया जोरदार सरींनी मुंबईकरांना २६ जुलै रोजी किंचित का होईना धडकीच भरविली. ठिकठिकाणी वाहतूककोंंडी आणि वाहनांचा वेग मात्र कमी झाला होता. विशेषत: सकाळी आणि दुपारी विश्रांती घेत बरसत असलेल्या पावसाने सायंकाळी ५ नंतर सलग मारा सुरू केला. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी तुंबले होते.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, गुरुवारी रात्री १० ते ११ वाजल्यापासून अरबी समुद्रासह मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे, पालघर आणि रायगडवर पावसाचे ढग जमा होऊ लागले होते. विशेषत: गुरुवारी रात्री १२ वाजता वाºयाचा वेग वाढत असतानाच मुंबईत तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळू लागल्या. रात्रभर मुंबईत तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा थांबून थांबून मारा होत असतानाच शुक्रवारी पहाटे मात्र पावसाने काही क्षण विश्रांती घेतली. सकाळी पाऊस थांबला असतानाच आकाश मोकळे झाल्याने कडाक्याचे ऊन पडले. मात्र काही क्षण वगळता दुपारी साडेबाराच्या सुमारास उपनगरात पावसाने पुन्हा जोर पकडला. दुपारी ३ वाजेपर्यंत पाऊस तुरळक बरसत असतानाच ढगांनी केलेला काळोख कायम होता. दुपारी ३ वाजता ढगांची गर्दी वाढली आणि सुरू झालेल्या जोरदार सरींनी मुंबईला झोडपून काढले. पंधरा मिनिटे पडलेल्या पावसाने पुन्हा ४.३० वाजेपर्यंत विश्रांती घेतली. त्यानंतर साडेपाच ते सहानंतर सुरू झालेल्या जोरदार सरींनी मुंबईला पुन्हा झोडपण्यास सुरुवात केली. २५ जुलैच्या सकाळी ८ वाजल्यापासून २६ जुलैच्या सकाळी ८ वाजेपर्यंत कुलाबा येथे १९.१ आणि सांताक्रुझ येथे ४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शुक्रवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ दरम्यान कुलाबा येथे २४.२ तर सांताक्रुझ येथे २३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ७ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. १७ ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

मुंबईसाठी अंदाज
२७ आणि २८ जुलै : मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या काही सरींसह तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील.
मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा व वेगवान वाºयाचा फटका छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणाºया हवाई वाहतुकीलाही बसला. मुंबई विमानतळावरून उड्डाण करणाºया, येथे उतरणाºया विमानांना तासभराचा विलंब झाला. वेगवान वारे, कमी दृश्यमानता व मुसळधार पाऊस यामुळे हा विलंब झाल्याची माहिती हवाई नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे काही विमाने रद्द करण्यात आली. १० विमानांचा मार्ग बदलला. दरम्यान, रात्रीच्या सुमारास मुंबईला येणारे गो-एअरचे विमान मुंबईतील पावसामुळे दिल्लीतच थांबवून ठेवल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.

Web Title: The 'thrust' in Mumbai; Air traffic along roads also hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस