हाताला लावला पायाचा अंगठा !, गमावलेली नोकरी मिळाली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 02:43 AM2017-09-02T02:43:03+5:302017-09-02T02:43:11+5:30

तब्बल तीन महिने अंगठ्याविना असलेल्या ३५ वर्षीय व्यक्तीच्या पायाचा अंगठा काढून हाताला लावण्यात आला. यशस्वी अंगठा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे अखेर उजव्या हाताने जेवणे त्याला शक्य झाले.

The thumb of his hand, the lost job was found | हाताला लावला पायाचा अंगठा !, गमावलेली नोकरी मिळाली परत

हाताला लावला पायाचा अंगठा !, गमावलेली नोकरी मिळाली परत

Next

मुंबई : तब्बल तीन महिने अंगठ्याविना असलेल्या ३५ वर्षीय व्यक्तीच्या पायाचा अंगठा काढून हाताला लावण्यात आला. यशस्वी अंगठा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे अखेर उजव्या हाताने जेवणे त्याला शक्य झाले. शिवाय गमावलेली नोकरीही परत मिळाली. नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
यांत्रिक भाग तयार करणाºया कारखान्यात काम करणाºया ऋषी (नाव बदलले आहे) यांचा अंगठा एका यंत्रात अडकला आणि त्यांना तो गमवावा लागला. तत्काळ उपचार करण्यासाठी दुखºया भागावर त्वचा लावण्यात आली, पण ते तीन महिने घरीच होते. अंगठा नसल्यामुळे त्यांना त्यांच्या दैनंदिन क्रिया करणे, जेवण करणे किंवा विविध वस्तू पकडणे कठीण जात होते. कॉस्मेटिक सर्जन डॉ. विनोद विज यांनी त्यांच्या हाताच्या अंगठ्याच्या जागी पायाच्या अंगठ्याचे प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे, नवी मुंबई येथील खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.
हाताच्या अंगठ्याच्या जागी पायाच्या अंगठ्याचे प्रत्यारोपण करणे ही अत्यंत दुर्मीळ शस्त्रक्रिया आहे. देशात हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच ठिकाणी ही शस्त्रक्रिया होते आणि ही शस्त्रक्रिया करून घेणारा माझा हा सहावा रुग्ण आहे. या शस्त्रक्रियेस सुमारे ६ तासांचा कालावधी लागतो. ही खूप क्लिष्ट शस्त्रक्रिया असते आणि यातील तांत्रिकतेमुळे काठीण्यपातळी अजून वाढते. या शस्त्रक्रियेत पायाचा अंगठा गमवावा लागतो. त्यामुळे ऋषीसारख्या केवळ काही व्यक्ती ही शस्त्रक्रिया करून घेण्यास तयार होतात, असे कॉस्मेटिक सर्जन डॉ. विनोद विज यांनी सांगितले.

कुटुंबीयांना मिळाला दिलासा
ऋषी हे कळंबोली येथे आईवडील, पत्नी आणि तीन वर्षीय मुलासोबत राहतात. शस्त्रक्रियेनंतर आता ते ज्या कारखान्यात काम करत होते, त्यांनी ऋषी यांच्या कंत्राटाचे नूतनीकरण करण्याचे ठरविले आहे; त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: The thumb of his hand, the lost job was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.