राज्यभरात वादळी व मुसळधार पावसाचे थैमान; वीज पुरवठा कायम ठेवण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 02:52 PM2020-05-17T14:52:57+5:302020-05-17T14:53:28+5:30

गेल्या महिन्याभरापासून राज्याच्या अनेक भागात वादळी व मुसळधार पावसाचे थैमान सुरु आहे. वादळामुळे झाडे किंवा झाडांच्या फांद्या वीजयंत्रणेवर कोसळल्याने अनेक भागातील वीजपुरवठयावर परिणाम होत आहे.

Thunderstorms across the state; Work begins at the war level to maintain power supply | राज्यभरात वादळी व मुसळधार पावसाचे थैमान; वीज पुरवठा कायम ठेवण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु 

राज्यभरात वादळी व मुसळधार पावसाचे थैमान; वीज पुरवठा कायम ठेवण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु 

Next

 

मुंबई : गेल्या महिन्याभरापासून राज्याच्या अनेक भागात वादळी व मुसळधार पावसाचे थैमान सुरु आहे. वादळामुळे झाडे किंवा झाडांच्या फांद्या वीजयंत्रणेवर कोसळल्याने अनेक भागातील वीजपुरवठयावर परिणाम होत आहे. या स्थितीमुळे गेल्या काही दिवसांत राज्यभरात वीजपुरवठा खंडित झाल्याच्या एकूण १ लाख ३९ हजार ७५१ तक्रारी महावितरणचे मोबाईल अ‍ॅप, वेबसाईट, टोल फ्री क्रमांक आदींद्वारे प्राप्त झाल्या. यापैकी ३८ टक्के म्हणजे तब्बल ५३ हजार १६० तक्रारी वीजग्राहकांनी मिस्ड कॉलच्या सुविधेचा वापर करून तर १ हजार ५८३ तक्रारी एसएमएसद्वारे नोंदविलेल्या असून, वादळी वारे, मुसळधार पावसादरम्यान झाडे कोसळून खंडीत झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युद्ध पातळीवर काम करत आहेत. 

महावितरणकडे राज्यभरात ४० हजार कर्मचारी आहेत. आणि ५ हजार २५० कर्मचारी हे एजन्सीचे आहेत. म्हणजे एकूण ४५ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. वादळ, वारा आला की असे सर्वच कर्मचारी काम करत असतात. गरजेनुसार ठिकठिकाणी काम केले जाते. वॉर फुटींगवर म्हणजे आवश्यक ठिकाणी युद्धपातळीवर काम करत वीज पुरवठा पूर्ववत केला जातो. बारामती, नागपूर, सोलापूर आणि आणखी काही जिल्हयात वादळी वारे वाहत आहेत. पाऊस होत आहे. विशेषत: विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामानात मोठया प्रमाणावर बदल होत आहेत. अशावेळी वादळी वा-यासह पावसामुळे विजेचे खांब कोसळत आहेत. फिडर बंद पडत आहेत. तांत्रिक अडचणी वाढत आहे. महत्त्वाचे म्हणजे आजघडीला लॉकडाऊनमुळे लोक  घरात आहेत. अशावेळी घरात बसलेल्या लोकांना ऐन ऊनं, वारा आणि पावसात अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून वेगाने काम केले जात आहे. वादळ, वारा, पाऊस यामुळे वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. आणि वीज पुरवठा खंडीत झाला तरी पर्यायी वीज पुरवठा सुरु करत बिघाड झालेल्या ठिकाणी वेगाने काम हाती घेतले जाते. आणि वीज पुरवठा पुन्हा सुरु केला जातो आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.

----------------------------

विजेच्या तारांवर उडाले घराचे पत्रे

नुकतेच पालीमध्ये आलेल्या वादळी वा-यामुळे महावितरणच्या पाली उपविभागातील नागोठणे शाखाचे  खूप  मोठे नुकसान झाले. जोरदार वारा व पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी विद्युत खांब पडले. अनेक ठिकाणी घराचे पत्रे उडून महावितरणच्या विद्युत तारावर पडले होते. यामुळे, नागोठणे व त्या लगतच्या परिसरातील  वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, महावितरणच्या पाली उपविभागातील नागोठणे शाखातील  कर्मचा-यांनी युद्धपातळीवर काम करून  संपूर्ण भागाचा वीजपुरवठा एका दिवसात पूर्ववत केला. 

----------------------------

वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी वीजग्राहकांना मोबाईलद्वारे मिस्ड कॉल व एसएमएसची सोय महावितरणने नुकतीच उपलब्ध करून दिली. यामध्ये आतापर्यंत राज्यातील ५३ हजार १६० वीजग्राहकांनी मिस्ड कॉल तर १ हजार ५८३ वीजग्राहकांनी एसएमएस सुविधेचा वापर करीत वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार दाखल केली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु असल्याने ही सेवा वीजग्राहकांसाठी अत्यंत सोयीची ठरत आहे. 


वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार मिस्ड कॉलद्वारे करण्यासाठी वीजग्राहकांनी त्यांच्या ग्राहक क्रमांकासोबत स्वत:च्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. अशा नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून महावितरणच्या ०२२-४१०७८५०० या क्रमांकावर वीजग्राहकांना मिस्ड कॉल द्यावा लागेल. 

----------------------------

- विजेचा खांब पडला. फिडर गेला. तांत्रिक अडचण आली तर ही समस्या सोडविण्यासाठी सहा ते सात तासांचा कालावधी लागतो.

- वीज पुरवठा खंडीत झालेला भाग आयसोलेटेड केला जातो.

- सहा ते सात तासांत पर्यायी वीज पुरवठा सुरु केला जातो.

----------------------------

Web Title: Thunderstorms across the state; Work begins at the war level to maintain power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.