तिकीट संग्राहक विभाग @ ७५

By admin | Published: June 22, 2016 02:25 AM2016-06-22T02:25:38+5:302016-06-22T02:25:38+5:30

पोस्ट विभागाने सुरू केलेल्या तिकीट संग्राहक विभागाला २१ जून २०१६ रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त मंगळवारी मुंबई जीपीओ कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात एका

Ticket collector section @ 75 | तिकीट संग्राहक विभाग @ ७५

तिकीट संग्राहक विभाग @ ७५

Next

मुंबई : पोस्ट विभागाने सुरू केलेल्या तिकीट संग्राहक विभागाला २१ जून २०१६ रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त मंगळवारी मुंबई जीपीओ कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात एका विशेष पाकिटाचे अनावरण करण्यात आले. या कव्हरवर गेट वे आॅफ इंडिया आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू यांची छायाचित्रे आहेत.
२१ जून १९४१ रोजी मुंबई जनरल पोस्ट आॅफीसमध्ये तिकीट संग्राहक विभाग (फिलेटॅलिक) सुरू करण्यात आला होता. याप्रसंगी मुंबई जीपीओचे संचालक व्ही. व्ही. सत्यनारायण रेड्डी, ज्येष्ठ तिकीट संग्राहक धीरुभाई मेहता आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या निमित्ताने विशेष रद्दीकरणाची (पिक्टोरिअल कॅन्सलेशन) सुरुवात करण्यात येत आहे.
मुंबई जीपीओ फिलॅटेली ब्युरो हा भारतातील सर्वात मोठे ब्युरो आहे. हा जागतिक स्तरावर ओळख असलेला हा भारतातील एकमेव ब्युरो आहे. या ब्युरोमधून स्थानिक ४ हजार ९४८ खातेधारकांना विविध प्रकारची सेवा दिली जाते. नवीन टपाल तिकिटे, मिनीएचर तक्ते आणि विशेष आवरणे दरमहा पुरविली जातात.
या व्यतिरिक्त हा ब्युरो एक नेहमी भेट देणाऱ्या ग्राहकांची पहिली पसंती आहे. शिवाय या ब्युरोद्वारे १०० हून अधिक विदेशी खातेधारकांना वरील प्रकारची सेवा पुरविण्यात येते. या कार्यक्रमात ज्येष्ठ तिकीट संग्राहक धीरुभाई मेहता यांनी आपल्या संग्रहाच्या छंदाविषयी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, की पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह म्हणजे छंदांच्या विश्वातील राजा आहे.
या छंदांमुळे माझ्याकडे वेगवेगळ््या विषयांवरची अनेक टपाल तिकिटे आणि पाकिटे देखील आहेत. या विभागाचा सदस्य असल्याने येथून मिळणारी सेवा ही अत्यंत प्रोत्साहन देणारी आहे. आताच्या तरुण पिढीनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून हा संग्रह करण्याचा छंद जोपासावा आणि या विभागाशी संलग्न व्हावे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: Ticket collector section @ 75

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.