प्रवाशाला मारहाण केल्याने तिकीट तपासनीस निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 06:15 AM2019-05-28T06:15:03+5:302019-05-28T06:15:11+5:30

पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे स्थानकात शनिवारी तिकीट तपासनीस आणि प्रवासी यांच्यामध्ये वाद झाला.

The ticket investigator suspended due to the assault of the trawler | प्रवाशाला मारहाण केल्याने तिकीट तपासनीस निलंबित

प्रवाशाला मारहाण केल्याने तिकीट तपासनीस निलंबित

googlenewsNext

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे स्थानकात शनिवारी तिकीट तपासनीस आणि प्रवासी यांच्यामध्ये वाद झाला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. त्यानंतर तिकीट तपासनिसाने प्रवाशाला मारहाण केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने पश्चिम रेल्वे प्रशासनाने सोमवारी त्या तिकीट तपासनिसाला निलंबित केले
आहे.
वांद्रे स्थानकातील फलाट क्रमांक १ वर प्रवासी प्रतीक शेडगे यांच्याकडून तिकीट तपासनिसाने तिकिटाची मागणी केली. या वेळी प्रतीक यांनी पास दाखविल्यावर पासच्या ओळखपत्रावरील शिक्का अस्पष्ट असल्याने तिकीट तपासनिसाने
त्यांना कार्यालयात नेले. त्यानंतर पास अवैध असून, दंडाची रक्कम
भरावी लागेल, असे तिकीट तपासनिसाने सांगितले. मात्र
प्रतीकने पास वैध असल्याचे सांगितले. मात्र, तिकीट तपासनीस आपल्या भूमिकेवर अडून बसल्याने दोघांत वाद झाला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करून प्रतीकने टिष्ट्वट करून पश्चिम रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा बल यांना टॅग केले. त्यानंतर पश्चिम रेल्वेने या प्रकरणाची दखल घेत तिकीट तपासनिसाला निलंबित केले.
याबाबत प्रतीकने वांद्रे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.

Web Title: The ticket investigator suspended due to the assault of the trawler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.