Join us  

'टायगर अभी जिंदा है...!' गुढीपाडवा मेळाव्यात घुमणार 'मनसे'च्या नव्या स्फूर्तीगीताचा आवाज, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 6:40 PM

मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात थोड्याच वेळात 'मनसे'च्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांचं भाषण होणार आहे.

मुंबई-

मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात थोड्याच वेळात 'मनसे'च्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांचं भाषण होणार आहे. पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसाठी गुढीपाडवा मेळावा खूप महत्वाचा मानला जातो. राज ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेमकं काय मार्गदर्शन करणार आणि राज्याच्या राजकारणावर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. पण त्यासोबतच गुढीपाडवा मेळाव्यात आणखी जोश आणण्यासाठी पक्षानं नवं स्फूर्तीगीतही तयार केलं आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत या नव्या स्फूर्तीगीताचं लॉन्चिंग होणार आहे. 

गुढीपाडवा मेळाव्यानिमित्तानं शिवाजी पार्कवर पक्षाचं नवं स्फूर्तीगीत निनादणार असून याचा एका मिनिटाचा टिझर पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करण्यात आला आहे. टिझरच्या सुरुवातीला मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे खंदे समर्थक बाळा नांदगावकर यांचा आवाज ऐकू येतो. 'टायगर अभी जिंदा है' असं बाळा नांदगावकर म्हणत असून पुढे गाण्याचा काही अंश टिझरमध्ये दिसतो. संपूर्ण गाणं थोड्याचवेळात पक्षाच्या मेळाव्यात वाजवलं जाईल आणि हेच पक्षाचं नवं स्फूर्तीगीत असणार आहे. 

मनसेच्या नव्या स्फूर्तीगीताचा टिझर पाहा...

गुढीपाडावा मेळाव्याची जोरदार तयारीमनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. यासाठी शिवाजी पार्क मैदानात भव्य व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यभरातून कार्यकर्ते दाखल होणार आहेत. राज ठाकरे रात्री आठ वाजताच्या सुमारात सभेला संबोधित करण्याची शक्यता आहे. याआधी पक्षातील महत्वाच्या नेत्यांची भाषणं होणार आहे. दरम्यान,  मनसेकडून शिवाजी पार्क, सेनाभवन परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे या आशयाचे बॅनर सेनाभवना समोर लावण्यात आले आहेत.

टॅग्स :राज ठाकरेमनसे