व्याघ्र संवर्धन प्रकल्प कार्यक्रम अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:06 AM2021-04-26T04:06:26+5:302021-04-26T04:06:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अपुरे प्रशिक्षण आणि अपुरी पध्दती यामुळे व्याघ्र संवर्धन प्रकल्प कार्यक्रम अपयशी ठरला आहे, असा ...

Tiger conservation project program fails | व्याघ्र संवर्धन प्रकल्प कार्यक्रम अपयशी

व्याघ्र संवर्धन प्रकल्प कार्यक्रम अपयशी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अपुरे प्रशिक्षण आणि अपुरी पध्दती यामुळे व्याघ्र संवर्धन प्रकल्प कार्यक्रम अपयशी ठरला आहे, असा निष्कर्ष व्याघ्र प्रकल्पच्या परिणामकारकतेच्या तपासणीत काढण्यात आला आहे, असे निसर्ग अभ्यासक रोहित वारंग यांनी सांगितले. शिवाय अलीकडे देशातील विशिष्ट राखीव क्षेत्रांमध्ये वाघांची संख्या घटू लागली आहे. व्याघ्र प्रकल्प भारतीय जंगलात शिकार करणे थांबविण्यात अपयशी ठरले आहे, असेदेखील रोहित वारंग म्हणाले.

सन १९७३मध्ये भारतात व्याघ्र संवर्धन प्रकल्प सुरु करण्यात आला होता. या प्रकल्पाचे उद्दिष्ट वाघाच्या अधिवासांचे संरक्षण करणे होते. भारतीय व्याघ्र संवर्धन कार्यक्रमाच्या अस्तित्त्वाच्या पहिल्या १५ वर्षात अपवादात्मक यश मिळाले. वाघांची संख्या १९७२ मध्ये ९ राखीव क्षेत्रामध्ये २८ वरून १९८१ मध्ये ११ राखीव क्षेत्रामध्ये ७५७ झाली. भारतीय वाघांची एकूण संख्या १९७२ ते १९७९ या काळात १८२७ ते ३०१५ एवढी वाढली, जी सात वर्षांत ११८८ने वाढली. हरण, हत्ती, गेंडा आणि जंगली म्हशी यांची संख्यासुद्धा वाढली. जवळपास ६ हजार लोकसंख्या असलेली गावे मूळ भागातून हलवली गेली आणि त्यांना संपूर्ण पुनर्वसन सुविधा पुरविल्या; ज्यात कृषी जमीन, शेती, नवीन घरे, शाळा आणि पाणी पुरवठा यांचा समावेश आहे. या बदलांमुळे संरक्षित क्षेत्रात वेगवान बदल झाले, असेदेखील रोहित वारंग यांनी सांगितले.

Web Title: Tiger conservation project program fails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.