Join us

‘थर्टी फर्स्ट’निमित्त राज्यात कडेकोट बंदोबस्त तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 4:07 AM

* पोलिसांना सतर्कतेचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज झाले असताना कोणतीही अनुचित ...

* पोलिसांना सतर्कतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज झाले असताना कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी राज्यात सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईसह राज्यात सर्व महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सुमारे दोन लाखांवर पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

कोरोना विषाणूच्या पादुर्भावाचा धोका कायम आहे. इंग्लंडमध्ये आढळलेल्या नव्या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता वाढली असल्याने ५ जानेवारीपर्यंत रात्रीची जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, ३१ डिसेंबरमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सोशल डिस्टस्टिंगचा फज्जा उडण्याची शक्यता असल्याने विशेष खबरदारी घेण्याची सूचना पोलिसांना देण्यात आली आहे.

राज्यात बहुतांश महापालिका क्षेत्रात रात्री संचारबंदी जारी असल्याने या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश घटकप्रमुखांना दिले आहेत.

बुधवारपासून सर्वत्र आवश्यकतेनुसार नाकाबंदी लावण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवला जाणार असून, याठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.