डहाणू : येत्या 15 ऑक्टोबरला राज्यात विधानसभेसाठी सर्वत्र मतदान होणार असल्याने 12 ते 14 ऑक्टो. या दरम्यान मोठय़ा प्रमाणात दमणदारू तसेच रोख रक्कमेची हेराफेरी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यातील सीमेवर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले असून येथून येणा:या जाणा:या प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. शिवाय पोलीस, राज्य उत्पादन शुल्क तसेच महसूल विभागाचे अनेक पथक तयार करण्यात आले असून ते पथक मुंबई-अहमदाबाद हायवे तसेच आच्छाड, आमगाव, उधवा, झाई, बोर्डी या भागात रात्रंदिवस गस्त घालत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखून शांतपणो निवडणुका पार पडावे या हेतूने निवडणुक आयोगाने खबरदारीचे उपाय म्हणून सर्व शासकीय अधिकारी तसेच कर्मचा:यांना जागृत राहण्याचे आदेश दिले आहेत. तर निवडणुकीदरम्यान कुठेही गालबोट लागू नये म्हणून पोलीस प्रशासनाला रात्रंदिवस सतर्क राहण्याचे आदेश पालघर जिल्हा पोलीस अधिक्षक महमद सुवेझ हक्क यांनी दिले आहेत.
पालघर जिल्ह्यातील डहाणू पासून केवळ 18 कि. मी. अंतरावर गुजरात राज्याची हद्द सुरू होते. त्यामुळे येथील दमणची अवैध दमण दारू मोठय़ा प्रमाणात महाराष्ट्रात येत असते. देशी, विदेशी दारू प्रचंड महाग झाल्याने स्वस्त असलेली दमणदारू सणासुदीच्या दिवसात तर निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही वेळ त्याचा उपयोग केला जात असल्याचा तक्रारी आहे. त्यामुळे डहाणू, वानगांव, घोलवड, कासा पोलीसांनी दमण दारूचा साठा रोखण्यासाठी सीमेवर नाकाबंदी सुरू केली आहे. तर गुजरातच्या उमरगाव येथेही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.(वार्ताहर)
4राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर डहाणू तसेच तलासरी तालुक्याला लागून असलेल्या गुजरात राज्यातील बलसाड जिल्हा तसेच दादरानगर हवेली मधील सैलवास या तिन्ही जिल्हय़ातील प्रमुख वरिष्ठ अधिका:यांची बैठक मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळील दापचरी येथे नुकतेच आयोजित करण्यात आली होती. बलसाडचे जिल्हाधिकारी डॉ. विक्रांत पांडे, सेलवासचे जिल्हाधिकारी मिना, पालघरचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, बलसाड पोलीस अधिक्षका निपुना तोखणो, पालघरचे पोलीस अधिक्षक हक या सह राज्य उत्पादन शुल्क महसुल व इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
4महाराष्ट्रातील निवडणुका प्रक्रियापूर्ण होईर्पयत बलसाड व सेलवासा जिल्हा प्रशासनाने अवैध मद्य व पैसा वाहतूकीवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवावे असे पोलीस महानिरिक्षक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.