Join us

वापरात नसलेला टिळकनगरचा पादचारी पूल पाडला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 5:58 AM

हार्बर मार्गावरील चेंबूर-टिळकनगर स्थानकादरम्यान असलेला विनावापर पादचारी पूल अखेर मध्य रेल्वेने हटविला आहे. हार्बर मार्गावरील ब्लॉक वेळेत ३ तासांचा पॉवर ब्लॉक घेत, मध्य रेल्वेने अनेक वर्षांपासून रखडलेला पादचारी पूल अखेर निकाली काढला.

मुंबई  - हार्बर मार्गावरील चेंबूर-टिळकनगर स्थानकादरम्यान असलेला विनावापर पादचारी पूल अखेर मध्य रेल्वेने हटविला आहे. हार्बर मार्गावरील ब्लॉक वेळेत ३ तासांचा पॉवर ब्लॉक घेत, मध्य रेल्वेने अनेक वर्षांपासून रखडलेला पादचारी पूल अखेर निकाली काढला.मध्य रेल्वेने १९८९ मध्ये २९ मीटर लांब असलेला १८ मेट्रिक टन वजनी पादचारी पूल टिळकनगर ते शेल कॉलनी येथील नागरिकांच्या सोईसाठी उभारला होता. सुरुवातीच्या काळात चेंबूर ते कुर्ला स्थानकांदरम्यान स्टेशन नव्हते. कालांतराने हार्बर मार्गावर टिळकनगर स्थानक बांधण्यात आले. टिळकनगर येथून २०० मीटर अंतरावर हा सार्वजनिक पूल होता. पूर्व-पश्चिम उपनगराला चेंबूर-सांताक्रुझ लिंक रोड निर्माण करण्यात आल्यानंतर या पुलाचा वापर कमी होत, अखेर बंद झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.दरम्यान, पुलावरील स्लॅबचा काही भाग या पूर्वीच काढण्यातआला होता. पुलाचे लोखंडी भागदेखील गंजल्याने पुलाचेपाडकाम यशस्वीपणे करण्यात आले. हार्बर मार्गावरील ब्लॉक काळात विशेष पॉवर ब्लॉक घेऊन टिळकनगर येथील पादचारी पूल पाडण्यात आल्याचे, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई