टेलिफोन ग्राहकांच्या संख्येने गाठला ११ कोटी ८३ लाखांचा टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 06:30 AM2019-07-15T06:30:26+5:302019-07-15T06:30:33+5:30
देशातील टेलिफोन ग्राहकांची संख्या एप्रिल महिन्याअखेरपर्यंत ११८३.७७ दशलक्ष झाली
- खलील गिरकर
मुंबई : देशातील टेलिफोन ग्राहकांची संख्या एप्रिल महिन्याअखेरपर्यंत ११८३.७७ दशलक्ष झाली असून त्यामध्ये ११६२.३० दशलक्ष वायरलेस ग्राहकांचा तर २१.४७ दशलक्ष इतर ग्राहकांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात एकूण ग्राहक संख्येमध्ये ०.२७ दशलक्ष वाढ झाली आहे. त्यामध्ये वायरलेस ग्राहकांच्या संख्येत ०.४९ दशलक्ष वाढ तर इतर ग्राहकांमध्ये ०.२२ दशलक्ष घट झाली आहे. हे प्रमाण वायरलेस ग्राहकांमध्ये ०.०४ टक्के वाढ तर इतर ग्राहकांमध्ये १.०३ टक्के घट असे आहे.
नागरी विभागात वायरलेस ग्राहकांची संख्या ६५२.३५ दशलक्ष तर इतर ग्राहकांची संख्या १८.५२ दशलक्ष अशी एकूण ६७०.८६ दशलक्ष आहे. एप्रिल महिन्यात नागरी विभागातील ग्राहकांच्या संख्येत १.७१ दशलक्ष वाढ झाली. त्यामध्ये वायरलेस ग्राहकांच्या संख्येत १.८६ दशलक्ष वाढ झाली, तर इतर ग्राहकांच्या संख्येत ०.१६ दशलक्ष घट झाली. हे प्रमाण एकूण ग्राहकांमध्ये ०.२५ टक्के असून वायरलेस ग्राहकांमध्ये ०.२९ टक्के वाढ तर इतर ग्राहकांमध्ये ०.८४ टक्के घट झाली. ग्रामीण भागातील ग्राहकांमध्ये १.४४ टक्क्यांची घट झाली आहे. त्यात वायरलेस ग्राहकांमध्ये १.३८ दशलक्ष तर इतर ग्राहकांमध्ये ०.०७ दशलक्ष घट झाली आहे. ग्रामीण भागातील टेलिफोन धारकांची संख्या ५१२.९१ दशलक्षवर घसरली असून वायरलेस ग्राहकांची संख्या ०.२७ टक्क्यांनी तर इतर ग्राहकांची संख्या २.२५ टक्क्यांनी घसरली आहे. ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या ५७१.९५ दशलक्ष झाली असून त्यामध्ये वायरलेस ग्राहकांची संख्या ५५३.५४ दशलक्ष असून इतर ग्राहकांची संख्या १८.४१ दशलक्ष आहे.