मध्य रेल्वेकडून १२ विशेष गाड्यांच्या वेळेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:07 AM2020-12-02T04:07:09+5:302020-12-02T04:07:09+5:30
मुंबई : मध्य रेल्वेने १२ विशेष गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. या विशेष गाड्या १ डिसेंबरपासून सुधारित वेळ आणि ...
मुंबई : मध्य रेल्वेने १२ विशेष गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. या विशेष गाड्या १ डिसेंबरपासून सुधारित वेळ आणि थांब्यासह चालविण्यात येतील.
मुंबई-कोल्हापूर विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएएसएमटी) येथून दररोज सकाळी ८.४० वाजता सुटेल. हीच गाडी कोल्हापूर येथून दररोज सकाळी ८.१५ वाजता सुटेल.
मुंबई-सोलापूर विशेष गाडी सीएएसएमटी येथून दररोज २२.४५ वाजता सुटेल. सोलापूर-मुंबई ही विशेष गाडी सोलापूर येथून दररोज २२.४० वाजता सुटेल. मुंबई-पुणे विशेष गाडी सीएएसएमटी येथून दररोज ०५.४० वाजता सुटेल. विशेष गाडी पुणे येथून दररोज १८.३५ वाजता सुटेल. मुंबई-पुणे विशेष गाडी सीएएसएमटी येथून दररोज १७.१० वाजता सुटेल. विशेष गाडी पुण्याहून दररोज ७.१५ वाजता सुटेल.
मुंबई-लातूर विशेष गाडी सीएएसएमटी येथून २१.०० वाजता सुटेल. विशेष गाडी लातूर येथून २२.३० वाजता सुटेल. मुंबई-मनमाड विशेष गाडी सीएएसएमटीहून दररोज १८.१५ वाजता सुटेल. विशेष गाडी मनमाड येथून दररोज ६.०२ वाजता सुटेल. मुंबई-नागपूर विशेष गाडी सीएएसएमटीहून दररोज २०.१५ वाजता सुटेल. विशेष गाडी नागपूरहून दररोज २०.४० वाजता सुटेल. पुणे-नागपूर विशेष सुपरफास्ट गाडी दर गुरुवारी पुणे येथून २२.०० वाजता सुटेल. सुपरफास्ट विशेष गाडी प्रत्येक शुक्रवारी नागपूरहून १५.१५ वाजता सुटेल.
* पुणे-अजनी विशेष गाडी दर शनिवारी पुणे येथून २२.०० वाजता सुटेल. विशेष गाडी दर रविवारी अजनीहून १९.५० वाजता सुटेल. दुसरी पुणे-अजनी विशेष गाडी दर मंगळवारी पुणे येथून १५.१५ वाजता सुटेल. विशेष गाडी दर शुक्रवारी अजनी येथून १९.५० वाजता सुटेल. पुणे-अमरावती विशेष गाडी दर बुधवारी पुणे येथून १५.१५ वाजता सुटेल. विशेष गाडी दर गुरुवारी अमरावतीहून १८.५० वाजता सुटेल. मुंबई-आदिलाबाद गाडी सीएएसएमटीहून दररोज १६.३५ वाजता सुटेल. विशेष गाडी आदिलाबाद येथून दररोज १३.०० वाजता सुटेल.
--------------------------------