हेडलीसाठी वेळेत बदल
By Admin | Published: February 7, 2016 02:41 AM2016-02-07T02:41:40+5:302016-02-07T02:41:40+5:30
मुंबईच्या हल्ल्याचा मास्टरमाइंड सय्यद झैबुद्दीन उर्फ अबू जुंदालवरील खटल्यामध्ये सरकारी वकिलांचा साक्षीदार बनलेला डेव्हिड हेडलीची साक्ष नोंदवण्यासाठी न्यायालयाने कामकाजाची वेळ बदलली
मुंबई : मुंबईच्या हल्ल्याचा मास्टरमाइंड सय्यद झैबुद्दीन उर्फ अबू जुंदालवरील खटल्यामध्ये सरकारी वकिलांचा साक्षीदार बनलेला डेव्हिड हेडलीची साक्ष नोंदवण्यासाठी न्यायालयाने कामकाजाची वेळ बदलली. दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) मंगळवारी न्यायालयात अर्ज केला होता. बुधवारी न्यायालयाने हा अर्ज मान्य केला.
अमेरिका व भारतीय वेळेत ११ तासांची तफावत असल्याने ८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ ते रात्री ९ व दुसऱ्या दिवशी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत न्यायालयाचे कामकाज चालावे, अशी विनंती एटीएसने केली होती.
या खटल्याच्या सुनावणीसाठी हेडलीला गुप्त ठिकाणाहून न्यायालयात आणावे लागते. एटीएसचा अर्ज मंजूर करण्यात आला तर अमेरिकेच्या वेळेनुसार एकाच दिवसात त्याची साक्ष नोंदवण्यात येईल, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला. (प्रतिनिधी)