यंदा नालेसफाईचे टायमिंग चुकणार

By admin | Published: January 24, 2016 01:17 AM2016-01-24T01:17:24+5:302016-01-24T01:17:24+5:30

नाल्यांऐवजी पालिकेच्या तिजोरीचीच सफाई करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली़ यापैकी पाच ठेकेदारांना नुकतीच अटकही झाली़ वर्षानुवर्षे सिंडिकेट

This time, due to this, the timing of Nalesfi is wrong | यंदा नालेसफाईचे टायमिंग चुकणार

यंदा नालेसफाईचे टायमिंग चुकणार

Next

- शेफाली परब-पंडित,  मुंबई
नाल्यांऐवजी पालिकेच्या तिजोरीचीच सफाई करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली़ यापैकी पाच ठेकेदारांना नुकतीच अटकही झाली़ वर्षानुवर्षे सिंडिकेट करून करोडो रुपयांच्या कंत्राटांवर हात साफ करणाऱ्या या ठेकेदारांना पालिकेने बाहेरचा रस्ता दाखविला खरा़ मात्र नव्या निविदांमध्येही ठेकेदारांनी पालिकेची नाकाबंदी केल्यामुळे नाल्यांच्या सफाईचे वेळापत्रक यंदाही बिघडण्याची शक्यता आहे़
नाल्यांमध्ये गाळ अडकून राहत असल्याने पावसाळ्यात पाणी तुंबते़ त्यामुळे वर्षभर नाल्यांची सफाई करून घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला़ मात्र नाल्यांच्या सफाईमध्ये ठेकेदारांनी दीडशे कोटी रुपयांचा घोटाळा करीत पालिकेच्या मोहिमेला हरताळ फासला़ वर्षानुवर्षे पालिकेला लुटणाऱ्या या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई आयुक्त अजय मेहता यांनी सुरू केली आहे़ त्याचबरोबर नाल्यांची सफाई निर्विघ्न पार पडण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली़
आतापर्यंत कमी दरांमध्ये काम करून ठगणाऱ्या ठेकेदारांनी या वेळेस चक्क ६० ते ३०० टक्के जादा दर भरून पालिकेची कोंडी केली़ पावसाळ्यात मुंबईची तुंबापुरी होऊ नये यासाठी पालिकेने जानेवारी महिन्यातच नाल्यांची सफाई सुरू करण्याचा निर्णय घेतला़ मात्र जुन्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात येत असताना नवीन ठेकेदारांचीही सोय होत नसल्याने नालेसफाईचे टायमिंग चुकण्याची शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली़

या ठेकेदारांवर कारवाईची शक्यता
मेसर्स हेमांग कन्स्ट्रक्शन, मे. इंद्रा कन्स्ट्रक्शन, मे. डी.के. एन्टरप्रायझेस, मे. एस.के. एन्टरप्रायझेस, मे. नंदिश कन्स्ट्रक्शन कं., मे. टी.ए. एन्टरप्रायझेस, मे. मर्सिसर इन्फ्राटेक, मे. अरिहंत कॉर्पोरेशन, मे. नरेंद्र कन्स्ट्रक्शन, मे. आर.के. अ‍ॅण्ड ब्रदर्स, मे. ओमकार इंजिनीअर्स, मे. चौधरी कन्स्ट्रक्शन, मे. केआरएस अ‍ॅण्ड जैन असोसिएट्स, मे. मनिष कन्स्ट्रक्शन, मे. ट्रायनिटी इन्फ्रा प्रोजेक्ट्स, मे. महिकेट्स, मे. केबीए इन्फ्रास्ट्रक्चर्स, मे. पॉप्युलर एन्टरप्रायझेस, मे. श्रीविराज इन्फ्राटेक, मे. अंबिका कन्स्ट्रक्शन, मे. विश्वशक्ती कन्स्ट्रक्शन, मे. आकाश इंजिनीअरिंग, मे. आरई इन्फ्रा.

या ठेकेदारांवर कारवाईची शक्यता
मेसर्स हेमांग कन्स्ट्रक्शन, मे. इंद्रा कन्स्ट्रक्शन, मे. डी.के. एन्टरप्रायझेस, मे. एस.के. एन्टरप्रायझेस, मे. नंदिश कन्स्ट्रक्शन कं., मे. टी.ए. एन्टरप्रायझेस, मे. मर्सिसर इन्फ्राटेक, मे. अरिहंत कॉर्पोरेशन, मे. नरेंद्र कन्स्ट्रक्शन, मे. आर.के. अ‍ॅण्ड ब्रदर्स, मे. ओमकार इंजिनीअर्स, मे. चौधरी कन्स्ट्रक्शन, मे. केआरएस अ‍ॅण्ड जैन असोसिएट्स, मे. मनिष कन्स्ट्रक्शन, मे. ट्रायनिटी इन्फ्रा प्रोजेक्ट्स, मे. महिकेट्स, मे. केबीए इन्फ्रास्ट्रक्चर्स, मे. पॉप्युलर एन्टरप्रायझेस, मे. श्रीविराज इन्फ्राटेक, मे. अंबिका कन्स्ट्रक्शन, मे. विश्वशक्ती कन्स्ट्रक्शन, मे. आकाश इंजिनीअरिंग, मे. आरई इन्फ्रा.
- जुन्या २४ ठेकेदारांना पालिकेने कारणे दाखवा नोटीस पाठविल्यानंतर त्यापैकी काहींनी न्यायालयातून स्थगिती मिळवली़ परिणामी ही कारवाई मागे घेण्याची नामुष्की पालिकेवर ओढावली़
- नव्या निविदांमध्येही ठेकेदारांनी ६० ते ३०० टक्क्यांपर्यंत जादा दर भरल्यामुळे पालिका पुरती हतबल झाली आहे़ त्यामुळे ठेकेदारांच्या कार्यअनुभवाची अट शिथिल करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे़
- मात्र या दिरंगाईमुळे यंदाही नाल्यांची सफाई लवकर सुरू करण्याचा प्रयत्न फेल जाण्याची शक्यता आहे़ तसेच पुन्हा ठेकेदारांना रान मोकळे होण्याची चिन्हे आहेत़
- मुंबईत मोठे व छोटे नाले तसेच नदींची एकूण लांबी ६५० कि़मी़ आहे़ यापैकी शहरात १०९ कि़मी़, पूर्व उपनगरांमध्ये २३० कि़मी़ आणि पश्चिम उपनगरांमध्ये ३११ कि़मी़ लांबीचे नाले आहेत.
- एकूण आठ लाख दोन हजार ८३१ मेट्रिक टन गाळ सुमारे १५ महिन्यांत काढणे अपेक्षित आहे़

Web Title: This time, due to this, the timing of Nalesfi is wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.