Join us

यंदा इस्टंट रांगोळीची महिलांना भुरळ

By admin | Published: November 03, 2015 12:58 AM

भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला मांगल्याचे प्रतीक मानले जाते. दिवाळीच्या सणात दारापुढील रांगोळी प्रत्येकाचे लक्ष वेधून घेणारी ठरते. धकाधकीच्या जीवनशैलीमुळे सण साजरे करण्याच्या

- प्राची सोनवणे, नवी मुंबईभारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला मांगल्याचे प्रतीक मानले जाते. दिवाळीच्या सणात दारापुढील रांगोळी प्रत्येकाचे लक्ष वेधून घेणारी ठरते. धकाधकीच्या जीवनशैलीमुळे सण साजरे करण्याच्या पध्दतीतही इस्टंट या शब्दावर अधिक भर देऊन कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम करण्याचा हा स्मार्टनेस आता सणांमध्येही पहायला मिळतो. विविध रंगांचा वापर करून काढल्या जाणाऱ्या रांगोळीची जागा आता इस्टंट रांगोळीने घेतली आहे.तासन्तास बसून रांगोळी काढण्यापेक्षा अगदी काही मिनिटात रांगोळी काढता येऊ शकते असा हा पर्याय म्हणजे इस्टंट रांगोळी. फ्लोटिंग,अ‍ॅक्र ेलिक तसेच वूडन शीट्सवर सजविलेल्या या रांगोळ्या आता बाजारात सहजरीत्या उपलब्ध आहेत. विविध आकाराच्या, रंगांच्या मोती, मणी, लेस असं सजावटीचं साहित्य वापरून कोयरी, आयताकृती, चौरस आकारातील अ‍ॅक्र ेलिक, वूडन, फ्लोटिंग शिट्सवर आकर्षक रांगोळ्या बनविलेल्या रांगोळ््या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या शिट्स स्वतंत्र असल्याने दोन-तीन रांगोळ्यांचे सेट्स विकत घेतले तरी त्यातून आपल्याला आपल्या आवडीची रंगसंगती आणि डिझाइनचं कॉम्बिनेशन करून एक नवी रांगोळी तयार करता येऊ शकते. केवळ रांगोळ्याच नव्हे तर अशा पद्धतीचे दिवेही बाजारात उपलब्ध आहेत. २०० ते १००० रुपयांच्या किमतीमध्ये या इस्टंट रांगोळी आणि दिवे बाजारात उपलब्ध असून वर्षानुवर्षे या इस्टंट रांगोळ््या वापरता येत असल्याने महिलांमध्ये या रांगोळीची मोठ्या प्रमाणात क्रेझ पहायला मिळते.१)रांगोळीच्या किमतीत कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नसून विके्रत्यांनी मात्र रांगोळीच्या वजनात घट केली आहे. सफेद रांगोळीचे लहान दोन ग्लास मागील वर्षी पंधरा रुपयांना मिळत असे, आता एकाच ग्लासची किंमत १० रुपये करण्यात आली असून एक मोठा ग्लास २० ते २५ रुपयांना आहे. रंगीत रांगोळीचे सहा छोटे चमचे १५ ते २० रुपयांनी मिळत आहेत. तर पांढऱ्या रांगोळीत रंग मिक्स केलेल्या रांगोळीचा एक ग्लास १५ रुपयांना आहे. २) रोजच्या रोज रांगोळी काढण्यापेक्षा रांगोळीचे तयार स्टीकर्स खरेदीचा पर्यायही महिलावर्गाची मोठ्या प्रमाणात पसंती आहे. हे स्टीकर्स साधारणपणे १० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत आहेत. या स्टीकर्समध्ये लक्ष्मीची पावले, संस्कार भारती, स्वस्तिक, कलश, फुलांच्या डिझाईन्स अशा विविध स्टीकर्सला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बाजारात रंगीत रांगोळीचे सध्या २३ रंग उपलब्ध असून रंगसंगती, गडदपणा व सौम्यपणा यामुळे सर्वच रंगांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.रेडिमेड रांगोळ््यांची महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ असून प्रत्येक सणाला या रांगोळीचा वापर करता येऊ शकतो. पूजेच्या वेळी चौरंगाभोवती देखील ही रांगोळी मांडून सुंदर सजावट करता येते. यामध्ये सर्व प्रकारची रंगसंगती उपलब्ध असून रांगोळीचा एक सेट तयार करायला जवळपास दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो. पाना-फुलांच्या आकाराला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.- मनीषा भोसले, रांगोळी विक्रेत्या, वाशी