'पवारांचा झंझावात पाहून भाजपला घाम फुटलाय'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 10:54 PM2019-09-24T22:54:50+5:302019-09-24T22:58:12+5:30
'रात नहीं ख्वाब बदलता है मंजिल नहीं कारवाँ बदलता है'
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक नेत्यांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. यावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेभाजपा सरकारवर हल्लाबोल केला आहे.
शरद पवार हे संपूर्ण महाराष्ट्रात मेळावे घेत आहेत. त्यांच्या मेळाव्यांना तरुणांचा मोठा प्रतिसाद आहे. पवारांचा हा झंझावात पाहून भाजपला घाम फुटला आहे. त्यामुळे शरद पवारांना अडचणीत आणण्याचे काम भाजप करत आहे, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटरवरून केली आहे.
धनंजय मुंडे यांनी ट्विटर म्हटेल आहे की, " श्री. पवार साहेबांच्या सभांना होणारी गर्दी पाहून भाजपला यांना घाम फुटलाय. म्हणून साहेबांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू झालाय. लक्षात ठेवा,
रात नहीं ख्वाब बदलता है
मंजिल नहीं कारवाँ बदलता है
जज्बा रखो जीतने का क्यूंकि
किस्मत बदले न बदले
पर वक्त जरुर बदलता है...
असा, शेर पोस्ट करुन त्यांनी सरकारलाही इशारा दिला आहे.
आदरणीय @PawarSpeaks साहेबांचा झंझावात पाहून भाजपला घाम फुटलाय. म्हणून साहेबांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू झालाय. लक्षात ठेवा,
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 24, 2019
रात नहीं ख्वाब बदलता है
मंजिल नहीं कारवाँ बदलता है
जज्बा रखो जीतने का क्यूंकि
किस्मत बदले न बदले
पर वक्त जरुर बदलता है...@BJP4Maharashtra
दरम्यान, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून एमआरए पोलीस ठाण्यात हायकोर्टाच्या आदेशानुसार अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांवर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आता (ईडी) देखील तपासाचा फास आवळत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवारांसह ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ईडीच्या या कारवाईमुळे राज्यातील राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दुसरीकडे, ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मला ईडीची कोणतीही नोटीस अद्याप मिळालेली नाही. आलीच तर मी चौकशीला सामोरे जाईन. तसेच माझ्यावर गुन्हा दाखल केला असेल तर मी त्यांचे स्वागत करतो सांगितले. तसेच, राज्यातील कोणत्याही बँकेचा मी संचालक नव्हतो. कधीही मी संचालक पदासाठी निवडणूक लढवली नाही. ज्या संस्थेचा मी सभासद देखील नाही आणि संस्थेने घेतलेल्या निर्णयात माझा सहभाग नाही, अशा प्रकरणात माझे नाव आल्याचेही शरद पवार यांनी सांगितले आहे.