आईचे अंत्यदर्शन ऑनलाइन घेण्याची आली वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 02:56 AM2020-04-17T02:56:49+5:302020-04-17T02:56:59+5:30

उरणमधील मुलाची व्यथा : लॉकडाउनचा फटका

Time to take Mom's funeral online | आईचे अंत्यदर्शन ऑनलाइन घेण्याची आली वेळ

आईचे अंत्यदर्शन ऑनलाइन घेण्याची आली वेळ

Next

उरण : लॉकडाउनमुळे उरण शहरात राहणाऱ्या नायर कुटुंबियांना आईच्या अंत्यविधीला जाता आले नाही. आईचे अंतिम दर्शन आॅनलाईन घेण्याची नामुष्की ओढावली.

सुनील नायर उरणमध्ये राहतात. गतवर्षी वडीलांच्या निधनानंतर त्यांची आई त्यांच्याकडेच राहायला आली होती. काही महिन्यांपासून ती मालाडला मुलीकडे राहण्यासाठी गेली होती. मंगळवारी आई सबिता (७७) यांचे हृदयविकाराने निधन झाले. घटनेची माहिती मुलगा सुनील आणि संजय यांना देण्यात आली. संजय आईच्या अंत्यविधीसाठी तात्काळ मुंबईला पोहचू शकला. मात्र सुनील यांना मुंबईत न जाण्याचा सल्ला नातेवाईकांनी दिला. आईचे अंतिम दर्शन त्यांना व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलवर घ्यावे लागले.

Web Title: Time to take Mom's funeral online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.