मुंबई - राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या, विदर्भातील पुरपरिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कंगना राणौत प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारी सरकारला धारेवर धरले. यावेळी गाजत असलेल्या मुंबई पोलिसांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी राज्याचा गृहमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत मला पूर्ण कल्पना आहे. मात्र कधी कधी राजकीय हितसंबधांचा प्रभाव पोलिसांच्या कामगिरीवर होतो. आता पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याबाबत म्हणाल तर या सभागृहामध्येही अनेकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही काळापूर्वी कल्याणच्या सभेत राज्यातील पोलीस हे भांडी घासायच्या लायकीचे आहेत, असे विधान केले होते. भूमिका बदलल्या की आपण कसे बदलतो याचं हे एक उदाहरण आहे. चर्चा करायची असेल, विषयांतर, विषय बदलायचे असतील तर ते कसं काय बदलता येतात हे आपण बघितलं आहेराज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांवर अत्याचाराची प्रकरणे घडली आहेत. आता कोविड केंद्रामध्येही महिला सुरक्षित नसतील तर त्या सुरक्षित कुठे असतील. राज्यात दिशा कायदा लागू करण्याबाबत चर्चा सुरू होती. त्याला आम्हीही समर्थन दिले असते. मात्र या दिशा कायद्याची दिशा कॅबिनेटच्या बैठकीत कशी बदलली हे ठावूक आहे, असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला.
इतर महत्त्वाच्या बातम्या