यंदा लसीकरण करून मोठमोठ्या गुढ्या उभारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:06 AM2021-01-14T04:06:27+5:302021-01-14T04:06:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनामुळे गेल्या मार्च महिन्यात मुंबईतील सर्व व्यवहार बंद झाले. त्यावेळी आपण गुढीपाडवा साजरा केला ...

This time we will vaccinate and build big gudhas | यंदा लसीकरण करून मोठमोठ्या गुढ्या उभारू

यंदा लसीकरण करून मोठमोठ्या गुढ्या उभारू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे गेल्या मार्च महिन्यात मुंबईतील सर्व व्यवहार बंद झाले. त्यावेळी आपण गुढीपाडवा साजरा केला नाही; पण यावेळेस आपण लसीकरण करून मोठ्या-मोठ्या गुढ्या उभारू, कलियुगातील संजीवनीच लसीच्या रूपाने आज मुंबईत आली आहे, असे प्रतिपादन महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी केले.

पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोव्हिशिल्ड लस मुंबईत आणण्यात आली. परळ विभाग कार्यालयातील स्टोरेज सेंटरमध्ये तिचा साठा करण्यात आला आहे. या केंद्रांची पाहणी महापौरांनी बुधवारी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. कोरोनारूपी संकटाचा गेले दहा महिने आपण सामना करीत आहोत. हनुमानाने ज्या प्रमाणे संजीवनी पर्वत उचलून आणला होता, त्याचप्रमाणे कोरोनावर मात करण्यासाठी संजीवनी लस रूपाने आली आहे. ही लस घेतल्याने कोरोनासह अनेक विषाणूचा सामना करण्यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती तयार होईल. लसीने कोरोनाचा खात्मा होणार आहे, असे विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेने आपला प्रभाव दाखविला. आता पुढची जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे. लसीकरणासाठी महापालिकेने पाच हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्याबरोबर तज्ज्ञ डॉक्टरही आहेत. आवश्यकतेनुसार आणखी दहा हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. नागरिकांनी पुढे येऊन लस घ्यावी. मात्र कोणीही अफवा पसरवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

..............................

Web Title: This time we will vaccinate and build big gudhas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.