मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही रेल्वेकडून मोलाचे योगदान दिले जात आहे. शनिवारी पश्चिम रेल्वेच्या लोकल आणि मेल एक्स्प्रेस सेवेत १०० टक्के वेळेचे पालन केले आहे.
पश्चिम रेल्वेच्या लोकल, पार्सल रेल्वे, मेल/ एक्स्प्रेसचे वक्तशीरपणा ९७ टक्के राहिला आहे. १ आणि ४ मे रोजी एक्स्प्रेस, राजधानी आणि लोकल सेवेने १०० टक्के वेळ पाळली आहे. पश्चिम रेल्वेचा मे महिन्यामध्ये ९७.४५ वक्तशीरपणा राहिला आहे. या बद्दल पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. मालवाहतूक, पार्सल, ऑक्सिजन गाड्या चालविण्याशिवाय पश्चिम रेल्वेने लॉकडाऊन व अनलॉक कालावधी दरम्यान मान्सूनपूर्व उपक्रम आणि देखभालीचे निरंतर विविध उपक्रम राबविले आहेत. त्याच वेळी मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा ही अधिकाअधिक चांगला राखत आहे.