मुंबई विद्यापीठाने प्रसिद्ध केले अॅडमिशनसाठीचे वेळापत्रक, अशी असेल प्रवेश प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 03:57 PM2020-07-22T15:57:33+5:302020-07-22T16:09:42+5:30
Mumbai University Admission 2020: राज्यातील आघाडीच्या शिक्षण केंद्रांपैकी एक असलेल्या मुंबई विद्यापीठाने अंडरग्रॅज्युएट अभ्यासक्रमांसाठीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.
मुंबई - विविध शिक्षण मंडळांचे बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थी वर्ग आणि पालकांचे लक्ष उच्च शिक्षणासाठीच्या प्रवेश प्रक्रियेकडे लागले आहेत. दरम्यान, राज्यातील आघाडीच्या शिक्षण केंद्रांपैकी एक असलेल्या मुंबई विद्यापीठाने अंडरग्रॅज्युएट अभ्यासक्रमांसाठीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. विद्यापीठाच्या https://mu.ac.in/ या अधिकृत संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे.
अंडर अभ्यासक्रमांसाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २२ जुलैपासून सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थी प्रवेशासाठी २२ जुलैपासून ऑनलाइन अर्ज करू शकतील. दरम्यान, मुंबई विद्यापीठामध्ये प्रवेशासाठी अ्ज करण्यासाठीची अंतिम तारीख ही ४ ऑगस्ट आहे. रजिस्ट्रेशन प्रक्रियेची संपूर्ण माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दे्ण्यात आली आहे. तसेच मुंबई विद्यापीठाने ट्विटरवर प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.
Admission schedule ( Pre Admission online Enrolment) of various under graduate courses for the academic year 2020-21 pic.twitter.com/xBYsClFrSS
— University of Mumbai (@Uni_Mumbai) July 21, 2020
मुंबई विद्यापीठाकडून ४, १० आणि १७ ऑगस्ट रोजी तीन वेगवेगळ्या मेरिट लिस्ट प्रसिद्ध केल्या जातील. तसेच विद्यापीठाच्या कुठल्याही एका महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एक अंडरटेकिंग सबमिट करावा लागेल.
मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती घेण्यासाठी तुम्ही मुंबई विद्यापीठाच्या ८४११८६०००४ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता.
असा करा मुंबई विद्यापीठातील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज
- सर्वप्रथम मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/ या अधिकृत संकेतस्थळवर जा
- त्यानंतर होम पेजवरील अॅडमिशन लिंकवर क्लिक करा
- नवीन पेज ओपन झाल्यावर स्वत:ला रजिस्टर करून घ्या
- आता रजिस्टर केलेले नाव आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉग इन करा
- अॅडमिशनच्या फॉर्मच्या लिंकवर क्लिक करा
- त्यानंतर या फॉर्ममध्ये सर्व माहिती भरून फॉर्म सबमिट करा
इतर महत्त्वाच्या बातम्या
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
धक्कादायक! कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी ५० हून अधिक मुलांना पाजली देशी दारू
नवीन नोकरी शोधताय? मग अजिबात करू नका या चुका, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान
coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी