गणेशोत्सवकाळात मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणात विघ्न

By admin | Published: October 3, 2015 02:05 AM2015-10-03T02:05:18+5:302015-10-03T02:05:18+5:30

गणेशोत्सवकाळात सोडण्यात आलेल्या विशेष ट्रेन आणि गणपती विसर्जनाचे असलेले चार दिवस यामुळे मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणाला मोठा फटका बसला

The timing of the Central Railway during Ganesh festival | गणेशोत्सवकाळात मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणात विघ्न

गणेशोत्सवकाळात मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणात विघ्न

Next

सुशांत मोरे, मुंबई
गणेशोत्सवकाळात सोडण्यात आलेल्या विशेष ट्रेन आणि गणपती विसर्जनाचे असलेले चार दिवस यामुळे मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणाला मोठा फटका बसला. मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर प्रत्येक दिवशी जवळपास २५0 लोकल गाड्यांना लेटमार्क लागल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे या दहा दिवसांत लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही लेटमार्कलाच सामोरे जावे लागले.
१७ सप्टेंबर रोजी गणपतींचे आगमन झाले. तत्पूर्वी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि यावेळी २६0 पेक्षा जास्त ट्रेन सोडण्यात आल्या. मागील वर्षी विशेष ट्रेनची हीच संख्या २१४ एवढी होती. या ट्रेन १७ सप्टेंबरपूर्वीच मध्य रेल्वेकडून सोडण्यास सुरुवात झाली आणि २७ सप्टेंबर अनंत चतुदर्शीच्या नंतरही या ट्रेन धावत होत्या. कोकणवासियांची गैरसोय टाळण्यासाठी सोडण्यात आलेल्या विशेष ट्रेनचे नियोजन मात्र मध्य आणि कोकण रेल्वेकडून व्यवस्थित करण्यात न आल्याने या ट्रेनचेही वेळापत्रक चांगलेच बिघडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याचा फटका गणेशोत्सव काळातील पंधरा दिवसात मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाड्यांना बसला. तसेच दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जनाबरोबरच पाच, सात आणि दहा दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनासाठीही मेन लाईन आणि हार्बरवरील फाटक काही वेळांसाठी सातत्याने उघडण्यात आल्याने वक्तशीरपणा बिघडण्यात याचीही भर पडली. एकूणच गणेशोत्सवकाळातील पंधरा दिवसांत प्रत्येक दिवशी जवळपास २५0 लोकल गाड्यांना लेटमार्क लागत होता, असे मध्य रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. त्या पंधरा दिवसांत मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा हा फक्त ७८ टक्के एवढा होता. मागील वर्षी गणेशोत्सवा दरम्यान वक्तशीरपणाची टक्केवारी ८२ टक्के एवढी होती. यंदा गणेशोत्सवात हीच टक्केवारी फारच घसरली.

Web Title: The timing of the Central Railway during Ganesh festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.