टिंकूसिंगला बुधवारपर्यंत कोठडी

By admin | Published: March 2, 2015 03:32 AM2015-03-02T03:32:28+5:302015-03-02T03:32:28+5:30

अंधेरीच्या लोखंडवाला संकुलात चार जणांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अटक केलेल्या टिंकूसिंग याच्यावर आज

Tincóning until the closet | टिंकूसिंगला बुधवारपर्यंत कोठडी

टिंकूसिंगला बुधवारपर्यंत कोठडी

Next

मुंबई : अंधेरीच्या लोखंडवाला संकुलात चार जणांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अटक केलेल्या टिंकूसिंग याच्यावर आज बलात्काराचे कलमही लावण्यात आले. न्यायालयाने त्याला ४ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान चारही मोबाईलचे सीडीआर (कॉल डीटेल्स रेकोर्ड ) पोलिसांनी मिळवले असून या रहस्यमयी आत्महत्या प्रकरणाचा उलगडा होण्याचा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
सोमनाथ पाल (२०), त्याची बहिण भारती (२५), आई शीखा (४५) आणि तिचा लिव्ह इन पार्टनर मनोज पटेल (५५) या चौघांचेही मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेमध्ये पोलिसांना शिशिरा आणि मोंटाना इमारतीच्या खोल्यांमध्ये सापडले. भारतीच्या वैद्यकीय अहवालात ती लैगिकदृष्ट्या सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांना भरतीच्या मृतदेहा शेजारी आढळलेल्या चिठ्ठी आणि व्हिडीओ मध्ये टिंकूसिंग ने केलेल्या लैगिक अत्याचारामुळे ती स्वताचे आयुष्य संपवत असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी टिंकूसिंग याच्यावर बलात्काराचे कलमही लावले असून याची चौकशी अद्याप पूर्ण झाली नसल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. त्यानुसार न्यायालयाने त्याला ४ मार्च पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सोमनाथ, भारती, शिख आणि मानिज यांच्या मोबाईलचे सीडीआरवरुन तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Tincóning until the closet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.