Join us

सारा तेंडुलकरच्या बनावट टि्वटर अकाऊंटवरून ‘टि्वट’ करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 5:13 AM

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिचे बनावट टि्वटर अकाउंट बनविणा-या प्रतापी सॉफ्टवेअर इंजिनीअरला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिचे बनावट टि्वटर अकाउंट बनविणा-या प्रतापी सॉफ्टवेअर इंजिनीअरला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नितीन शिसोदे (३९) असे अटक तरुणाचे नाव आहे. सारा तेंडुलकरच्या नावाने बनावट टिष्ट्वटर अकाउंट सुरू करून त्या अकाउंटवरून त्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिष्ट्वट केले होते. शिसोदेचे ज्याच्याशी वैर होते त्या मित्राला पवार जवळचे वाटत होते. हे समजताच शिसोदेने साराच्या अकाउंटचा वापर करून पवार यांना लक्ष्य केल्याचे तपासात समोर आले.अंधेरीचा रहिवासी असलेला शिसोदे सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. तो एका इंटरनेट सर्च इंजीन कंपनीत फ्रीलान्सिंग करतो. त्याने इंटरनेट मार्केटिंगमध्येही काम केले आहे. पाच महिन्यांपूर्वी नितीनने गुगलवरून साराचा फोटो डाउनलोड केला. त्यानंतर तिच्या नावाने बोगस टिष्ट्वटर अकाउंट उघडले. गेल्या वर्षी ९ आॅक्टोबरला याच बोगस अकाउंटवरून शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह टिष्ट्वट करण्यात आले होते. त्याचदरम्यान सारा लंडमध्ये शिकत असल्याने सचिनच्या स्वीय साहाय्यकांनी सायबर पोलिसांत तक्रार केली होती. या प्रकरणी सायबर पोलिसांनी चौकशी केली. दोन महिन्यांच्या चौकशीअंती ज्या मोबाइल फोनवरून बोगस टिष्ट्वटर अकाउंट उघडले होते त्याच्या आयएमईआय क्रमांकावरून पोलिसांनी मोबाइल क्रमांक आणि आयपी अ‍ॅड्रेस ट्रेस केला. त्याआधारे शिसोदेला अटक केली. न्यायालयाने ९ फेब्रुवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.शिसोदे याचे एका तरुणासोबत वैर आहे. त्या मित्राला धडा शिकविण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. वैर असलेल्या मित्राला पवार जवळचे वाटत असल्याचे त्याला माहीत होते. घटनेच्या आदल्या रात्री त्याने वृत्तवाहिनीवर पवार यांच्यासंदर्भातील बातमी पाहिली आणि मित्राचा राग पवार यांच्यावर व्यक्त करण्याचे ठरवले. त्यासाठी साराच्या बनावट अकाउंटचा वापर केल्याचे पोलिसांना सांगितले. त्याचा कुठल्या मित्रासोबत वाद होता? त्यात कितपत तथ्य आहे, याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे सायबर सेलचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितले. त्याचा लॅपटॉप जप्त करून फॉरेन्सिकसाठी पाठविला आहे.>कुटुंबीयांचेही बनावट अकाउंटशिसोदेने स्वत:च्या कुटुंबीयांचीही बनावट अकाउंट तयार केली आहेत. तसेच सारासह अन्य काही सिनेसृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्रींचे बनावट अकाउंट तयार केले आहे. याबाबत सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.