ठाणो : ठाणो परिवहन सेवेच्या बंद पडलेल्या 234हून अधिक बसेससाठी परिवहनकडे पैसा नसल्याने आता या बसेस दुरुस्त होऊन त्या ठाणोकर प्रवाशांना लवकरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी टीएमटी कृती बचाव समिती रस्त्यावर उतरली आहे. या समितीच्या माध्यमातून गुरुवारी सॅटीसवर अनोखे आंदोलन करण्यात आले असून, प्रवाशांकडून दुरुस्तीचे पैसे गोळा केले गेले.
ठाणो परिवहन सेवा बेस्टमध्ये विलीन करा या मागणीचा जोर वाढू लागल्यानंतर परिवहनची सध्याची स्थिती कशी आहे, याचा लेखाजोखाच ‘लोकमत’मध्ये काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर आता परिवहनला सावरण्यासाठी पुन्हा एकदा संघटना आणि शिवसेनासुद्धा पुढे सरसावली आहे.
आता या समितीच्या माध्यमातून गुरुवारी सायंकाळी 6 ते 7 या वेळेत सॅटीसवर अनोख्या पद्धतीने आंदोलन करून प्रवाशांकडून वर्गणीच्या माध्यमातून बसेस दुरुस्तीसाठी निधी गोळा केला गेला असल्याची माहिती समितीचे पदाधिकारी सत्यजीत शहा यांनी दिली.
दुसरीकडे जाग या संस्थेनेसुद्धा परिवहनचा कारभार सुधारण्यासाठी काही उपाययोजना सुचविल्या आहेत. यामध्ये सद्य:स्थितीत परिवहनच्या काय समस्या आहेत, त्यावर कशा पद्धतीने उपाय करता येऊ शकतात आणि ठाणोकरांना चांगली सेवा कशी देता येऊ शकते यासंदर्भातील आठ पानांचा अहवाल संस्थेने आयुक्तांना सादर केला आहे.
(प्रतिनिधी)
च्प्रत्यक्षात परिवहनमध्ये सध्या नादुरुस्त अवस्थेत असलेल्या बसेसची संख्या ही 234च्या घरात गेली असून, या बसेसची दुरुस्ती करण्यासाठी परिवहनकडे निधी नाही. यासाठी सॅटीसवर अनोखे आंदोलन करण्यात येऊन प्रवाशांकडून पैसे घेण्यात आले.