टीएमटीचे कर्मचारी आज सामूहिक रजेवर

By Admin | Published: August 15, 2015 12:45 AM2015-08-15T00:45:00+5:302015-08-15T00:45:00+5:30

कोर्टाने आदेश देऊनही ६१५ कर्मचाऱ्यांना अद्यापही परिवहनने सेवेत सामावून न घेणे, परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांची रखडलेली १२५ कोटींची देणी न देणे, यासह विविध मागण्यांसाठी ठाणे

TMT employees today on collective leave | टीएमटीचे कर्मचारी आज सामूहिक रजेवर

टीएमटीचे कर्मचारी आज सामूहिक रजेवर

googlenewsNext

ठाणे : कोर्टाने आदेश देऊनही ६१५ कर्मचाऱ्यांना अद्यापही परिवहनने सेवेत सामावून न घेणे, परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांची रखडलेली १२५ कोटींची देणी न देणे, यासह विविध मागण्यांसाठी ठाणे परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी सामूहिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शनिवारी त्याचा फटका सुमारे अडीच लाख प्रवाशांना बसणार आहे.
टीएमटीच्या ताफ्यात एकूण ३१८ बसेस असून रोज रस्त्यांवर केवळ २०० च्या आसपास बस धावतात. रोज अडीच लाखांच्या आसपास प्रवासी प्रवास करीत असून यापोटी २५ लाखांच्या आसपास उत्पन्न मिळत आहे. (प्रतिनिधी)

येत्या आठ दिवसांत कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात तोडगा काढण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. त्यानुसार आंदोलन मागे घेण्यास सांगितले आहे. परंतु, तरीही आंदोलन झाल्यास कारवाई केली जाईल.
- देविदास टेकाळे, व्यवस्थापक, ठाणे परिवहन सेवा

Web Title: TMT employees today on collective leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.