टीएमटीचे टीसींना वसुलीचे टार्गेट
By admin | Published: December 6, 2014 10:29 PM2014-12-06T22:29:13+5:302014-12-06T22:29:13+5:30
आता परिवहन प्रशासनाने केवळ 22 तुटपुंजे वाहतूक निरीक्षक अर्थात टीसींकडून रोज दिवसाला 75क् ते 15क्क् रुपयांची वसुलीची अपेक्षा ठेवली आहे.
Next
अजित मांडके ल्ल ठाणो
परिवहनचा गाडा आजही रुळांवर नसून कर्मचा:यांची देणी, नव्या बससाठी कर्ज घेणो, दुरुस्ती होत नसलेल्या बससाठी निधी नसणो आदी समस्या असताना आता परिवहन प्रशासनाने केवळ 22 तुटपुंजे वाहतूक निरीक्षक अर्थात टीसींकडून रोज दिवसाला 75क् ते 15क्क् रुपयांची वसुलीची अपेक्षा ठेवली आहे. विशेष म्हणजे परिवहनचे 65 मार्ग असून त्या तीन शिफ्टमध्ये हे टीसी काम करीत असून आता टार्गेट देण्यात आल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
ठाणो परिवहन सेवेच्या ताफ्यातील 313 बसपैकी आजघडीला प्रत्यक्षात 27क् ते 29क् बस रस्त्यावर धावत असल्याने रोज तब्बल 5 लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. तसेच प्रवासी आणि उत्पन्नातदेखील रोज घट होते. कर्मचा:यांची सुमारे 1क्क् कोटींहून अधिकची देणी बाकी आहेत. त्यात आता नव्या बससाठी परिवहन 13क् कोटींचे कर्ज काढणार आहे. त्यामुळे आर्थिक डोलारा आणखीनच कोसळणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलण्याऐवजी त्यांनी आपल्या टीसींना टार्गेट देण्याचे तुघलकी धोरण आखले आहे. सध्या परिवहनच्या 65 मार्गावरून 22 टीसींकडून रोज केवळ 3 ते 4 हजारांचीच वसुली होत असून त्यांना आता रोज प्रत्येकी 75क् ते 15क्क् रुपयांचे ‘लक्ष्य’ देण्यात आले आहे. त्यामुळे अधूनमधून दिसणारे टीसी आता शहरातील विविध बसथांब्यांवर दिसू लागले आहेत. विशेष म्हणजे परिवहन सेवा सुरू झाल्यापासून आजतागायत परिवहनच्या बसची संख्या 9क् वरून 313 तर प्रवाशांची संख्यादेखील 25 हजारांवरून दीड ते अडीच लाखांच्या घरात जाऊनही टीसींची संख्या मात्र तेवढीच आहे. त्यांच्यावरच 65 मार्गाची मदार आहे.
विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून परिवहनने ठाण्याबाहेर बोरिवली, अंधेरी, स्पीझ, मीरा रोड आदी मार्गावर आपल्या सेवा सुरू केल्या आहेत. त्यामुळे या टीसींवरील ताण आणखीनच वाढला आहे. तीन शिफ्टमध्ये काम करीत असताना एकेका शिफ्टला सात ते आठ टीसीच 65 मार्गावर देखरेख ठेवून आहेत. त्यामुळे त्यांची दमछाक होत आहे. मागील 25 ते 26 वर्षात सहायक वाहतूक निरीक्षकपदावर (टीसी) काम करणा:या 22 पैकी केवळ दोन ते तीन कर्मचा:यांचीच पदोन्नती करण्यात आली आहे. इतर आजही पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना आजही यासाठी पत्रव्यवहार करावा लागत आहे.
विशेष म्हणजे ठाणो परिवहन सेवेनंतर सुरू झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेत आजघडीला सुमारे 7क् ते 75 टीसी आहेत. तीच गरज ठाणो परिवहन सेवेचीदेखील असून टीसींचीदेखील गेल्या कित्येक वर्षापासून भरती प्रक्रिया रखडली आहे.
त्यात महागाईभत्ता, धुलाईभत्ता, पाचव्या-सहाव्या वेतन आयोगांची थकबाकी आदींसह विविध प्रकारचे भत्तेदेखील सर्वच कर्मचा:यांना मिळाले नाहीत. त्यामुळे हे कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत. त्यातच आता दिलेल्या टार्गेटमुळे या सर्वच टीसींची तारेवरची कसरत सुरू झाली आहे.
4काही दिवसांपूर्वी काढलेल्या या फतव्यानंतर ज्या टीसींकडून ही वसुली झाली नाही, अशा सुमारे 15 टीसींना आतार्पयत कारणो दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
4विविध मार्गावर काम करणा:या टीसींना प्रवाशांच्या मन:स्तापालादेखील सामोरे जावे लागत आहे. तिकीट न काढणा:या प्रवाशाकडून केवळ 5क् रुपये दंड आणि तिकिटाचे भाडे वसूल करणो अपेक्षित आहे. परंतु, काही वेळेस प्रवासी गयावया करीत असल्याने त्यांना तसेच सोडून द्यावे लागत असल्याची माहिती काहींनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.