Join us

शरद पवारांची मोठी घोषणा; राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 12:55 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे.

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन मी निवृत्त होणार असल्याची मोठी घोषणा आज शरद पवार यांनी केली. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये 'लोक माझा सांगाती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ही घोषणा केली.  

शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीसांची एका वाक्यात सूचक प्रतिक्रियायापुढे मी तीनच वर्ष राजकारणात राहणार आहे. राष्ट्रवादीच्या पुढच्या अध्यक्षपदासाठी नवीन समिती स्थापन करणार. नवीन समिती अध्यक्षपदाचा निर्णय घेईल, असंही शरद पवार म्हणाले.  

यावेळी सभागृहातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. सभागृहात शरद पवार यांच्या घोषणा सुरू होत्या. यावळी बोलताना शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्या.  

शरद पवार म्हणाले, १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून गेली २४ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनीक जीवनातील १ मे १९६० पासून सुरू झालेला हा संपूर्ण प्रवास गेली ६३ वर्ष अविरत सुरू आहे. यातील ५६ वर्ष मी कुठल्या ना कुठल्या सभागृहात सदस्य म्हणून काम केलं आहे. राज्यसभेची पुढची तीन वर्ष राहिली आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या अधिकाधीक प्रश्नांवर लक्ष घालण्यावर माझा भर असेल, असंही शरद पवार म्हणाले.  

आपल्याला माहिती आहे, माझा अनेक संस्थांशी कामकाजामध्ये सहभाग आहे. रयत शिक्षण संस्था (सातारा), विद्या प्रतिष्ठान (बारामती), मराठा मंदीर मुंबई, महात्मा गांधी सर्वादय संघ, अशा अनेक संस्थांच्या कामकाजामध्ये माझा सहभाग आहे, या कार्यांवर मी अधिक भर देणार आहे, असंही शरद पवार म्हणाले.  

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस