वाचन संस्कृती टिकून राहण्यासाठी पुस्तक प्रदर्शन वर्षभर विविध ठिकाणी घेण्यात यावे- राज ठाकरे

By मनोहर कुंभेजकर | Published: February 25, 2023 03:44 PM2023-02-25T15:44:50+5:302023-02-25T15:45:09+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज पार्क उद्यान येथील स्व. मीनाताई ठाकरे स्मरकाजवळ मॅजेस्टिक बुक डेपो यांच्या सहकार्याने पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले आहे.  

To sustain the culture of reading book exhibitions should be held at various places throughout the year says Raj Thackeray | वाचन संस्कृती टिकून राहण्यासाठी पुस्तक प्रदर्शन वर्षभर विविध ठिकाणी घेण्यात यावे- राज ठाकरे

वाचन संस्कृती टिकून राहण्यासाठी पुस्तक प्रदर्शन वर्षभर विविध ठिकाणी घेण्यात यावे- राज ठाकरे

googlenewsNext

मुंबई :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज पार्क उद्यान येथील स्व. मीनाताई ठाकरे स्मरकाजवळ मॅजेस्टिक बुक डेपो यांच्या सहकार्याने पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले आहे.  

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. वाचन संस्कृती टिकून राहावी यासाठी पुस्तक प्रदर्शन वर्षभर विविध ठिकाणी घेण्यात यावे असा सल्ला त्यांनी आयोजकांना दिला. 

यावेळी मनसे नेते अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत, प्रकाश महाजन, संदीप देशपांडे, मॅजेस्टिक बुक देपोचे अक्षय कोठावळे व पुस्तक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुस्तक प्रेमी व वाचकांसाठी पुस्तकांचा अमूल्य ठेवा  मनसेने उपलब्ध करून दिला आहे.वाचनाने आपल्या ज्ञानात भर पडते याच उद्देशाने मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने  वाचकांसाठी १००० नामवंत प्रकाशकांची दहा हजारांहून अधिक पुस्तकांचा ठेवा पुस्तक प्रेमी व वाचकांना पुस्तक प्रदर्शनातून घेता येणार आहे.तसेच विद्यार्थ्याना रामायण, महाभारत कळावे यासाठी त्याच्या १ हजार प्रति विकत घेऊन त्या स्थानिक शाळांना देणार असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.

कादंबरी ते विविध साहित्य, कार्टून चरित्र अशी वाचनीय पुस्तके याच बरोबर ययाती, छावा, छत्रपती संभाजी महाराज, पुरुषार्थ, शहा जिजाई, छत्रपती शिवाजी महाराज, आज्ञा पत्र अशी अनेक पुस्तके    या प्रदर्शनात मांडण्यात आली असून वाचकांना ही पुस्तके २० टक्के सवलतीत घेता येतील. वाचकांसाठी हे प्रदर्शन शनिवार दिनांक २५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत पाहता येईल.

 यशवंत किल्लेदार यांनी २००७ पासून मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथ दिंडी, कवी संमेलन असे विविध कार्यक्रम मराठी भाषा दिनानिमित्त राबविण्यास मनसेने पहिली सुरुवात केली याचाच एक भाग म्हणून यावर्षी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आहे.

Web Title: To sustain the culture of reading book exhibitions should be held at various places throughout the year says Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.