राज्य हिताच्या विषयांना चालना देण्यासाठी पुढाकार घेणार; नीलम गोऱ्हेंनी घेतली राज्यपालांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 07:19 PM2023-04-04T19:19:45+5:302023-04-04T19:20:26+5:30

महिला पर्यटकांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर राज्यपालांना दिले निवेदन ; विधीमंडळ कामकाजाचा अहवाल केला सादर 

To take initiatives to promote matters of state interest; Neelam Gorhe met the Governor | राज्य हिताच्या विषयांना चालना देण्यासाठी पुढाकार घेणार; नीलम गोऱ्हेंनी घेतली राज्यपालांची भेट

राज्य हिताच्या विषयांना चालना देण्यासाठी पुढाकार घेणार; नीलम गोऱ्हेंनी घेतली राज्यपालांची भेट

googlenewsNext

मुंबई - राज्यात येणाऱ्या विदेशी महिला पर्यटकांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर आज विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. महिला पर्यटक सुरक्षेबाबत केंद्र आणि राज्य सरकारने मिळून काही मार्गदर्शक सूचना (SOP) तयार केल्या आहेत का आणि त्याचे पालन योग्य पद्धतीने होत आहे किंवा नाही याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी यासह विविध मागण्यांसाठी त्यांनी ही भेट घेतली. 

विशेषत: राज्यातील तीर्थक्षेत्र विकासाबाबत अधिक काम करण्याची गरज डॉ. गोऱ्हे यांनी राजभवन येथे बोलताना व्यक्त केली. यावर राज्यपालांनी ' महाराष्ट्रात ठिकठिकाणी राज्याच्या हिताच्या अनेक विषयांना चालना देण्यासाठी पुढाकार घेऊन सहकार्य करणार आहे,' असे आश्वासन दिल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. महाराष्ट्राचे रमेश बैस यांची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राजभवनात सदिच्छा भेट घेतली. 

या भेटीत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राज्यपालांना विविध विषयांबाबत निवेदन दिले. या चर्चेत डॉ. गोऱ्हे यांनी राज्यातील विविध प्रश्नाकडे राज्यपाल बैस यांचे लक्ष वेधले. सर्व पातळ्यांवर कामकाजात मिळालेल्या सहकार्याबद्दल राज्यपालांनी सकारात्मकता दर्शविली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत मंजूर झालेली विविध विधेयके, कामकाज याची माहिती यावेळी राज्यपालांना देण्यात आली. महिला सुरक्षेच्या प्रश्नावर प्रलंबित असलेले बहुचर्चित 'शक्ती विधेयक' लवकरच मंजूर होणार असल्याचे विधिमंडळ कामकाजात राज्य सरकारने सांगितल्याची माहिती यावेळी दिली. त्या विषयात राज्यपालांकडूनही सहकार्य मिळावे अशी अपेक्षा उपसभापतींनी व्यक्त केली. 

राज्यपालांनी यावेळी  बोलताना 'राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक भूमिकेतूनच आजवर काम करीत आहे. झारखंडमध्ये काम करीत असताना अनेक सामाजिक विषयात सहभागी पद्धतीने लोकसहभाग मिळवूनच काम केले आहे. त्याद्वारे लोकांच्या हिताचे अनेक विषय मार्गी लावले आहेत.' लोकसभेचे सदस्य म्हणून जनतेच्या हितासाठी काम केल्याच्या अनेक आठवणीना त्यांनी उजाळा दिला.  यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या चर्चेत कामकाजाबाबत केलेल्या सूचनांचे पालन करून कामकाजात योग्य तो अवलंब करण्याबाबतही त्यांना राज्यपालांनी आश्वासित केले. 

Web Title: To take initiatives to promote matters of state interest; Neelam Gorhe met the Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.