महालक्ष्मी, मुंबादेवीच्या दर्शनाला जायाचं... जायाचं... उद्यापासून जागर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 09:55 AM2024-10-02T09:55:46+5:302024-10-02T09:55:56+5:30

भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चोख व्यवस्था; भव्य मंडप उभारणी, विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल  

To visit Mahalakshmi, Mumbadevi... To visit... Wake up from tomorrow | महालक्ष्मी, मुंबादेवीच्या दर्शनाला जायाचं... जायाचं... उद्यापासून जागर

महालक्ष्मी, मुंबादेवीच्या दर्शनाला जायाचं... जायाचं... उद्यापासून जागर

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील महालक्ष्मी, मुंबादेवी मंदिरांसह उर्वरित मंदिरे उद्या गुरुवारपासून सुरू होत असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी सज्ज होत आहेत. त्यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रम होणार असून, मंदिर प्रशासनाने त्या दृष्टीने तयारी केली आहे.

भाविकांच्या सुरक्षेसाठी ४० सीसीटीव्ही कॅमेरे, तर प्रवेशद्वारावर बॅग स्कॅनर बसविण्यात आला आहे. साफसफाई व प्रशस्त, अशा मंडप व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली. मुंबादेवी मंदिर गुरुवारी पहाटे ५:३० वाजता मंगला आरती करून उघडले जाईल. सकाळी ७ ते ७:४० या वेळेत घटस्थापना होईल. ७ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता दीपोत्सव, १२ ऑक्टोबरला विश्वकल्याणासाठी श्रीचंडी महायज्ञ केला जाणार आहे. या यज्ञाचा प्रारंभ पहाटे ४ वाजता होईल. पूर्णाहुती सकाळी १० ते १०:३० दरम्यान होईल. सकाळी ११ नंतर दसरा साजरा होईल. 

महालक्ष्मी मंदिरात पहाटेपासून दर्शन
    मंदिर रोज पहाटे ५:३० वाजता         दर्शनसाठी खुले होणार आहे. 
    सकाळी आरतीसाठी 
    ७ ते ७:३० वाजेपर्यंत     
    दुपारी नैवेद्यासाठी 
    १२ ते १२:२०
    सायंकाळी धूपारतीसाठी 
    ६:३० ते ६:४० 
    रात्री आरतीसाठी ७:३० ते ८ 
    गाभारा दर्शनासाठी बंद असेल. 
    रात्री १०:३० वाजता बंद होईल. 

    मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी भुलाबाई देसाई मार्गावरील शोभा हॉटेल ते शीतल स्टोअरपर्यंत मंडप बांधण्यात आला आहे. मंदिरामध्ये डॉक्टरांचे पथक सज्ज आहे.
    सुरक्षेची जबाबदारी गावदेवी पोलिस ठाण्यावर, तर वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी ताडदेव पोलिस ठाण्यावर आहे.
    मेटल डिटेक्टरमधून भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. भाविकांसाठी विशेष बसची व्यवस्था बेस्टने केली आहे.  

Web Title: To visit Mahalakshmi, Mumbadevi... To visit... Wake up from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.