मुंबई : ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्वेक्षणानुसार, गेल्या सात वर्षांमध्ये १५ ते १७ या वयोगटांतील मुलांमध्ये, तंबाखू सेवनाचे प्रमाण २.९ टक्क्यांवरून ५.५ टक्क्यांवर आल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. याखेरीज पहिल्यांदा सिगारेट ओढणा-यांचे वय सरासरी १८.५ वरून १७.४ वर्षे असल्याचे सर्वेक्षणात अधोरेखित करण्यात आले आहे. टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स हे सर्वेक्षण केलेअसून, शुक्रवारी टाटा मेमोरिअल रुग्णालयात अनावरण करण्यात आले.या सर्वेक्षणासाठी देशभरात आॅगस्ट २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान ७४,०३७ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले, तर राज्यात सर्वेक्षणासाठी १,५१७ पुरुष आणि १,६२४ महिलांचा समावेश करण्यात आला होता. राज्यात ६ टक्के पुरुष आणि १.४ टक्के महिला सिगारेट ओढतात. या सर्वेक्षणानुसार खैनी आणि गुटखा यांचे सर्वाधिक सेवन होत असल्याचे आढळलेआहे.१५.५ टक्के लोक खैनी, तर ८.६ टक्के लोक गुटख्याचे सेवन करतात. २०१०च्या तुलनेत २०१७ मध्ये तंबाखू सेवन करणाºयांची संख्या जवळपास ५ टक्क्यांनी घटल्याचे म्हटले आहे. या सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, राज्यात तंबाखू सेवन करणाºयांच्या संख्येत जवळपास ५ टक्क्यांनी घट झाली आहे.तंबाखू, गुटखा यांचे व्यसन अल्पवयीन मुले मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. घरातली भांडणे, अभ्यासाचा तणाव तसेच घरातील मोठ्या माणसांना असलेले व्यसन अशा अनेक बाबींमुळे ती या व्यसनाकडे वळत आहेत. सुरुवातीला गंमत म्हणून तंबाखू, गुटखा खाणाºया या मुलांना हळूहळू त्याची सवय लागल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्यांना वेळीच व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
अल्पवयीन मुलांना तंबाखूचे व्यसन, ग्लोबल अॅडल्ट टोबॅकोचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 5:37 AM