आज १२ वाजून २५ मिनिटांची कर्जत शेवटची लोकल; उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 03:41 AM2018-09-08T03:41:59+5:302018-09-08T09:37:09+5:30
कल्याण-ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर आणि कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. तर, पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरही ब्लॉक घेण्यात येईल.
मुंबई : कल्याण-ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर आणि कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. तर, पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरही ब्लॉक घेण्यात येईल.
कल्याण ते ठाणे मार्गादरम्यान रविवारी (९ सप्टेंबर) सकाळी १०.५४ ते दुपारी ४.१९ वाजेपर्यंत अप जलद मार्गावर ब्लॉक असेल. या काळात सर्व लोकल फेऱ्या अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे लोकल फेºया सुमारे १५ मिनिटे आणि मेल-एक्स्प्रेस सुमारे ३० मिनिटे विलंबाने धावतील. प्रवाशांच्या सोईसाठी काही लोकल फेºयांना अतिरिक्त थांबा देण्यात येईल.
हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी मार्गावर सकाळी ११.१० ते ४.१० वाजेपर्यंत एकही लोकल धावणार नाही. प्रवाशांच्या सोईसाठी सीएसएमटी-कुर्ला-वाशी-पनवेल मार्गावर विशेष फेºया चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना रविवारी सकाळी १० ते दुपारी साडे चार वाजेपर्यंत मध्यसह ट्रान्स हार्बरने प्रवासाची मुभा रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत लोकल जलद मार्गावरून धावतील. यामुळे काही लोकल फेºया रद्द करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.
आज १२ वाजून २५ मिनिटांची कर्जत शेवटची लोकल
सीएसएमटी ते मशीद स्थानकादरम्यान शनिवारी रात्री १२ वाजून ३५ मिनिटांपासून सकाळी ६ वाजून ५ मिनिटांपर्यंत रात्रकालीन ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येईल. यामुळे सीएसएमटी येथून मध्यरात्री १२ वाजून २८ मिनिटांनी सुटणारी ठाणे आणि १२ वाजून ३१ मिनिटांनी सुटणारी कुर्ला लोकल रद्द करण्यात येईल. परिणामी, १२ वाजून २५ मिनिटांनी सुटणारी सीएसएमटी-कर्जत हीच शेवटची लोकल असेल, असे मध्य रेल्वेने सांगितले.